मुंबई : "धारावीतील सकल हिंदू समाज पीडित कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे. धर्मांधांनी पुन्हा वस्तीतील कुठल्याही हिंदु बांधवांना त्रास द्यायचा प्रयत्न केला किंवा त्यांच्याकडे वाकड्या नजरेनेही पाहण्याचा प्रयत्न केला; तर शांत बसलेल्या हिंदुंचा तिसरा डोळा उघडेल आणि तांडव काय असतं याचे दर्शन होईल.", असा सज्जड इशारा भाजप आमदार आणि हिंदुत्त्ववादी नेते नितेश राणे यांनी धातावीतील धर्मांधांना दिला.
धारावीतील सकल हिंदु समाजातर्फे गुरुवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी धारेश्वर शिव मंदिर, क्रॉस रोड, धारावी येथे नितेश राणेंच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली. तत्पूर्वी राणेंनी राजेश कदम आणि देवेंद्र (बबलू) नारायणकर यांच्या कुटुंबीची त्यांनी भेट घेतली. शिवजयंतीच्या दिवशी धारावी क्रॉस रोड येथील काही धर्मांधांकडून कदम आणि नारायणकर कुटुंबातील काही जणांवर हल्ला झाला होता. त्याची दखल राणेंनी भेटीदरम्यान घेलती.
नितेश राणे यावेळी म्हणाले, "देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यामुळे प्रशासनानेही जिहाद्यांचे लाड करणे थांबविले पाहिजे. मंदिर परिसरात अनधिकृतपणे उभारलेली मांस विक्रीकेंद्रांवर त्वरीत कारवाई व्हायला हवी. आज धारावीतील धर्मांधांनी फक्त ट्रेलर पाहिलाय, उद्या पिक्चर दाखवला तर तो परवडणार नाही. कारण हिंदू जागा झाला आहे."
दरम्यान नितेश राणेंनी अबुबकर चाळ, बगीचा मैदान, धारावी येथे उभारण्यात आलेला 'दारुल उलूम अहले सुन्नत'चा 'इमाम-ए-अझम अबू-हनिफा' नावाचा अनधिकृत मदरसा (काही दिवसांपूर्वी मदरशावरून बॅनर हटवण्यात आला आहे), पॅलेस्टाईन समर्थनार्थ उभारण्यात आलेले झेंडे, बगीचा मैदान परिसरात वाढलेली अतिक्रमणे, महिलांना धर्मांधांकडून होणारा त्रास अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करत यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
धारावीला मिनी पाकिस्तान करण्याचा विचार
'रात्री-अपरात्री मैदानात इतर धर्मातील काही मुलांचा व्हॉलीबॉल खेळत मोठमोठ्या आवाजात त्रास देण्याचा प्रकार गेले काही दिवस सुरु होता. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अरेरावी करत कुटुंबावर हात उचलला. स्त्री-पुरुष काही न पाहता ते अंगावर धावून आले. त्यातील काहींनी कुटुंबातील दोघांवर रॉड आणि बांबूने हल्ला केल्याने दोघांना दुखापत झाली आहे. धारावीतून हिंदूंनी निघून जावं, अशी त्यांची कुटनिती असून धारावीला मिनी पाकिस्तान करण्याचा त्यांचा विचार आहे.', अशी माहिती कदम आणि नारायणकर कुटुंबीयांनी नितेश राणेंच्या भेटीदरम्यान दिली.