नवी दिल्ली : गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एका न्यायालयाने लव्ह जिहाद प्रकरणी मुलगा आणि वडिलांना शिक्षा जाहीर केली आहे. हिंदू असल्याची बतावणी करून जनजाती समुहातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या इम्तियाजला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी त्याचे वडील शब्बीर यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना दंडही ठोठावला आहे. याआधीही इम्तियाजने एका हिंदू मुलीसोबत घृणास्पद कृत्य केले होते.
इम्तियाजने पीडितेचा अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलही केले.इम्तियाजसोबत त्याचे वडील शब्बीर यांनीही याच पीडितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. मुळात पीडिता इम्तियाजची तक्रार घेऊन शब्बीरकडे गेली होती. अल्पवयीन मुलीची तक्रार ऐकण्याऐवजी शब्बीरने तिला आपल्या वासनेचा शिकार बनवण्याचा प्रयत्न केला.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा येथील आहे. इम्तियाज पठाण जनजाती समुहातील १७ वर्षांची अल्पवयीन मुलीला हिंदू असल्याचे भासवत भेटला. त्याने त्याचे नाव भावीन सांगितले. यानंतर इम्तियाजने तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावली. त्यावेळी पीडित मुलगी बारावीची परीक्षा देत होती.
एके दिवशी आरोपी इम्तियाजने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले आणि तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने या कृत्याला विरोध केल्यावर इम्तियाज तिला लग्नाच्या नावाखाली फूस लावून गप्प बसायचा. यावेळी इम्तियाजने मुलीचा अश्लील व्हिडिओही बनवल्याचा आरोप आहे. तोच व्हिडिओ दाखवून त्याने पीडितेला तोंड बंद ठेवण्याची धमकीही दिली.एके दिवशी पीडितेला इम्तियाजच्या बॅगेत तिचे ओळखपत्र सापडले. तेव्हाच मुलगी इम्तियाज मुस्लिम असल्याचे समजले. पीडित मुलगी तात्काळ इम्तियाजचे वडील शब्बीर यांच्याकडे तक्रार घेऊन गेली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, शब्बीरने तिच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही. त्याने मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याला विरोध करत मुलीगी कशीबशी घरी परतली.
घरी आल्यानंतर अल्पवयीन मुलीने संपूर्ण हकीकत वडिलांना सांगितली. अखेर मुलीच्या वडिलांनी डेडियापाडा पोलिसात एफआयआर दाखल केला. पोलिसांनी पोक्सो कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला. यानंतर इम्तियाज आणि त्याचे वडील शब्बीर यांना अटक करण्यात आली. नर्मदा जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणी आता अखेर निकाल देण्यात आला आहे.न्यायालयाने इम्तियाज पठाण याला १० वर्षे सक्तमजुरीसह १७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर इम्तियाजचे वडील शब्बीर यांनाही ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शब्बीरला ६ हजार रुपये दंडही भरावा लागणार आहे. न्यायालयाने अल्पवयीन पीडितेला ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
नर्मदा न्यायालयाचे वकील जितेंद्र गोहिल यांनी सांगितले की, आरोपींना पॉक्सो कायद्यानुसार शिक्षा झाली आहे. त्याने सांगितले की, आरोपी मुस्लिम असूनही हिंदू नावाने ओळखपत्र बनवून हिंदू मुलींना आपली शिकार बनवत असे आणि त्यांना प्रेमात अडकवून त्यांच्यावर बलात्कार करत असे. यात त्याचे वडील शब्बीर यांनीही त्याला साथ दिली.आरोपी इम्तियाजने १० वर्षांपूर्वी नांदोड तालुक्यातील एका गावातील एका हिंदू मुलीशी लग्नही केले होते. या लग्नापासून तिला एक मुलगी देखील झाली, जी आता सात वर्षांची आहे. नंतर इम्तियाज आपली मुलगी आणि पत्नीला सोडून पळून गेला. तो डेडियापाडा तालुका परिसरात राहू लागला आणि येथेच त्याने भावीन नावाने अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात अडकवले.