नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आणि परवा (२२ व २३ फेब्रुवारी) उत्तर प्रदेश आणि गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी दोन्ही राज्यांमध्ये अनुक्रमे ४८ हजार आणि १३ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे लोकार्पण व पायाभरणी करणार आहेत.पंतप्रधान आज अहमदाबाद येथे गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या (जीसीएमएमएफ) सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होतील. ते दुपारी महेसाणा येथे वलीनाथ महादेव मंदिरात पूजा करतील तसेच दर्शन घेतील. त्यानंतर, महेसाणातील तारभ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. ते येथे 8,350 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करतील.
पंतप्रधान दुपारी च्या सुमारास नवसारी येथे पोहोचतील. तिथे ते सुमारे 17,500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण, पायाभरणी आणि कामांचा प्रारंभ करतील. संध्याकाळी काक्रापार अणुऊर्जा केंद्राला ते भेट देतील आणि दोन नवीन प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर्सचे (पीएचडब्लूआर) राष्ट्रार्पण करतील.पंतप्रधान 23 फेब्रुवारी रोजी, वाराणसीमध्ये बनारस हिंदू विद्यापीठाच्या स्वतंत्रता सभागृहात संसद संस्कृत स्पर्धेच्या विजेत्यांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात सहभागी होतील. ते सकाळी संत गुरु रविदास यांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर संत गुरु रविदास यांच्या 647 व्या जयंतीनिमित्त आयोजित सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. पंतप्रधान मोदी दुपारी सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. येथे ते वाराणसीमधील 13,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.