गीतकार गुलजार व रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

    17-Feb-2024
Total Views |
rambhadracharya-and-gulzar-honoured-with-dnyanpith-award
 
मुंबई : हिंदी चित्रपट गीतकार तथा उर्दू कवी गुलजार (संपूरण सिंह कालरा) यांना साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार ज्ञानपीठ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर, जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी गोस्वामी तुलसीदासांच्या लेखनावरही विपुल संशोधन केले आहे. या कार्याची दखल घेत त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, संस्कृत भाषेतील योगदानाबद्दल जगद्गुरू रामभद्राचार्य यांना हा सन्मान देऊन गौरविण्यात येत आहे.
दरम्यान, कवी गुलजार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत हिंदी-उर्दू शब्द वापरून गाणी आणि गझल लिहिल्या आहेत. तर रामभद्राचार्य यांनी संस्कृतमध्ये अनेक पुस्तके लिहिली आहेत. या कार्यगौरवासाठी उभयंतांची २०२३ सालच्या ‘ज्ञानपीठ पुरस्कारा’साठी निवड झाली आहे. उर्दू भाषेतील कार्य आणि योगदानासाठी गुलजार यांना 'ज्ञानपीठ पुरस्कार' देऊन गौरविण्यात येत आहे.


रामभद्राचार्य हे चित्रकूट येथील 'तुलसीपीठ' चे संस्थापक

अपंगांसाठी एक विद्यापीठ आणि शाळा

१००हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.

 
 
गुलजार यांना २००२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार
 
२००४ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

२०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार