अमेझॉन प्राईम व्हिडिओ अडचणीत
कॅलिफोर्निया फेडरल कोर्टात फसवणूकीची केस दाखल
मुंबई: नुकतेच अमेझॉन कंपनीचे ओटीटी प्लॅटफॉर्म (अमेझॉन प्राईम व्हिडिओ) अडचणीत सापडला आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओवर हातचलाखीचा आरोप करत एफटीसी या संस्थेने कॅलिफोर्निया फेडरल कोर्टात गुन्हा दाखल केला आहे. प्राईम व्हिडिओवर पूर्वीच विना जाहिरात प्लॅनसाठी वार्षिक वर्गणी भरूनदेखील 'जाहिरात सपोर्टेड प्लॅन' दाखवून विना जाहिरात प्लॅनसाठी अधिक पैसे भरण्याची मागणी केल्याचा आरोप अमेझॉन प्राईम व्हिडिओवर करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात अमेझॉन प्राईमने आपले धोरण बदलत' अँड सपोर्टेड' योजना घोषित केली होती.
परंतु या योजनेपूर्वी वर्गणी भरलेल्या ग्राहकांना अधिकचे पैसे भरण्यासाठी कंपनीकडून गळ घातल्याचा आरोप तक्रारनाम्यात केला गेला आहे. त्यामुळे विश्वासघात, फसवणूक या आरोपाखाली ५ लक्ष डॉलरची नुकसानभरपाई कंपनीकडे मागण्यात आली आहे. यापुर्वी अमेझॉन प्राईमने ' विना जाहिरात' म्हणून ओटीटीची जाहीरात करून आपला ब्रँड बाजारात वाढवला होता. परंतु आता मात्र अमेझॉन जाहिरातीसह प्लॅन बाजारात आणल्याचा ठपका ठेवत अमेझॉन प्राईम व्हिडिओ अनैतिकतेने नफा कमावत असल्याचा दावा फिर्यादीकडून करण्यात आला आहे.
यामध्ये करार तोडणे, खोट्या जाहिराती, ग्राहकांच्या हक्काचे उल्लंघन केल्याचा आरोप प्लॅटफॉर्मवर करण्यात आला असल्याने डिसेंबर २३ पूर्वी सबस्क्रिप्शन सेवा घेतलेल्यांची फसवणूक होत असल्याचा दावा केला होत आहे. काही तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, अँड सपोर्टेड प्लानमध्ये व्हिडिओ क्वालिटीत घसरली असल्याचे व अघोषितपणे डॉल्बी साऊंड सपोर्ट काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे .
.