छत्रपती शिवाजी महाराज 'शिवसन्मान पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित

    01-Feb-2024
Total Views | 38
shivsanmsn puraskar


सातारा : छत्रपतींच्या घराण्याकडुन देण्यात येणारा पहीला छत्रपती शिवाजी महाराज शिवसन्मान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित झाला आहे. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व या वर्षी शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पुर्ण होण्याच्या निमित्ताने सातारा येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
 
सातारा येथिल सैनिकी स्कुलच्या मैदानावर हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. छत्रपती शिवाजी महारांजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी नुकतेच या सोहळ्यासाठी मैदानाची पाहणी केली आहे. कार्यक्रमासाठी सातारा सैनिकी स्कुलचे मैदान निश्चीत करण्यात आले आहे. येथे हा भव्य दिव्य पुरस्कारसोहळा सपंन्न होणार आहे.
 
याच दिवशी पुरस्कार सोहळ्याबरोबरच सातारा जिल्हांतील विविध विकासकामांचे लोकार्पण व उद्गाटने ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहेत. त्यामुळे सातारा मध्ये सध्या या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे.

 
दक्षिण मुंबईचे आमदार व मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या सन्मानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. आपल्या 'एक्स' आकाउंट वर पोस्ट करत ते म्हणाले. "छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून मोदीजी यांनी देशाला सक्षम व आत्मनिर्भर केले आहे. त्यांचा हा सन्मान सर्व शिवभक्तांसाठी आनंदाचा क्षण आहे. या सन्मानासाठी मा नरेंद्र मोदी जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!"

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121