नवी दिल्ली : हैदराबादमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. अदिती भारद्वाज असे या पीडित महिलेचे नाव आहे. ती काही काळ प्रियकर मोहम्मद अलीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. अलीने पीडितेचे धर्मांतर करून तिचे नाव अजिया फातिमा असे ठेवले आणि ती गर्भवती राहिल्यानंतर त्याने आपल्याच धर्मातील महिलेशी लग्न केले, असे सांगितले जात आहे.
तरी पीडितेने दि.२८ जानेवारी २०२४ रोजी आत्महत्या केली. मूळची बिहारची असलेली आदिती भारद्वाज गेली अनेक वर्षे हैदराबादमध्ये सॉफ्ट इंजिनीअरिंग म्हणून काम करत होती. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आदिती पुर्वविवाहीत होती. परंतु तिने आपल्या पतीला घटस्फोट दिला होता आणि पीडिता १२ फेब्रुवारी रोजी हैदराबादमध्ये मोहम्मद अलीशी लग्न करणार होती. पण अलीने शेवटच्या क्षणी म्हणजे लग्नाआधीच तिचा विश्वासघात केला. आदितीला हा विश्वासघात सहन झाला नाही आणि ती हळूहळू डिप्रेशनमध्ये गेली.
नैराश्याचे एक कारण मोहम्मद अलीकडून फसवणूक होत होते, तर दुसरे कारण अदितीची गर्भधारणा होती. काही रिपोर्ट्समध्ये, अदितीची तब्येत काही काळापूर्वी खालावली होती, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये जावे लागले होते. अदितीची रुग्णालयात तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समोर आले.
हा रिपोर्ट बघून अदिती खूप घाबरली. तिने यासंदर्भात मोहम्मद अलीला फोन करून माहिती दिली. कोणताही उपाय न सापडल्याने २८ जानेवारीला त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी आली. आत्महत्येचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस या संदर्भात तपास करत आहेत. त्यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.