बदलापूर घटनेनंतर शाळांमध्ये बालकांच्या संरक्षणाची खबरदारी

    09-Dec-2024
Total Views | 21
School

ठाणे : बदलापूर ( Badlapur ) येथील शालेय अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर जिल्ह्यातील शाळांनी बालकांच्या संरक्षणासाठी कोणत्या खबरदारी घेतल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी ‘ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा’चे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्या. श्रीनिवास अग्रवाल यांच्या आदेशाने व ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा’चे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका व जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, संस्था आणि मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. या विषयाबाबत बैठक घेणारा ठाणे जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
बैठकीत गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांनी “शैक्षणिक संस्थांमध्ये बालकांच्या लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे,” असे सांगितले. “बालसुधारगृहांमधील बाल आरोपींमध्ये ‘पोक्सो’च्या गुन्ह्यातील बालकांची संख्या लक्षणीय आहे.

मोबाईलमधील पॉर्नचे व्यसन, हे चित्र बदलायचे असेल, तर ते शिक्षकच बदलू शकतात,” असा विश्वास मुख्य न्याय दंडाधिकारी एस. के. फोकमारे यांनी व्यक्त केला. या विषयासंदर्भात कोणाला काही मदत अथवा मार्गदर्शन हवे असल्यास महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधण्याबाबत आवाहन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना ‘गुड टच, बॅड टच’चे प्रशिक्षण

शाळेशी निगडित सर्वांना कायदे व बालकांच्या हक्कांचे संरक्षण याविषयी प्रशिक्षण देणे, तसेच प्रत्येक कर्मचार्‍याचे पोलीस पडताळणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. शाळांमध्ये सीसीटीव्ही व त्याचे एक महिनाभराचे बॅकअप जतन असणे गरजेचे आहे. शालेय स्टाफला व मुलांना सायबर गुन्ह्यांबाबत सावधगिरीचे प्रशिक्षण देण्यात यावे. पायाभूत सुविधांसोबतच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ‘गुड टच, बॅड टच’बाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्याचे आवाहन न्या. सूर्यवंशी यांनी केले.

विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात ठाणे जिल्हा राज्यात पहिला

राजकुमार डोंगरे यांनी “शैक्षणिक संस्थांमध्ये बालकांच्या लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे,” असे सांगितले. “बालसुधारगृहांमधील बाल आरोपींमध्ये ‘पोक्सो’च्या गुन्ह्यातील बालकांची संख्या लक्षणीय आहे.

मोबाईलमधील पॉर्नचे व्यसन, हे चित्र बदलायचे असेल, तर ते शिक्षकच बदलू शकतात,” असा विश्वास मुख्य न्याय दंडाधिकारी एस. के. फोकमारे यांनी व्यक्त केला. या विषयासंदर्भात कोणाला काही मदत अथवा मार्गदर्शन हवे असल्यास महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधण्याबाबत आवाहन करण्यात आले.

अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121