कल्याण : गेली १६० वर्षे अविरत वाचनसेवा देणारे सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पु. भा. भावे व्याख्यानमाले अंतर्गत ‘विद्यार्थी चालवितात वाचनालय’ हा एक आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ९ डिसेंबर पासून सुरू झालेला हा उपक्रम ११ डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमात कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूल, कल्याणमधील विद्यार्थी सार्वजनिक वाचनालय कल्याणचे कामकाज पाहणार आहेत. सोबतच विद्ययार्थांच्या मार्फत ग्रंथांची देवघेव केली जाणार असून विद्यार्थी वाचकांशी संवाद साधून त्यांची अभिरुचि जाणून घेणार आहेत.