अद्याप आठ आमदार शपथविधीविना

    09-Dec-2024
Total Views | 46
Vidhanbhavan

मुंबई : विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ देण्यासाठी दि. ७ डिसेंबर रोजीपासून विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. मात्र, विविध पक्षांतील आठ आमदारांनी ( MLA ) निर्धारित वेळेत शपथ घेतली नसल्याचे समोर आले आहे. ते जोपर्यंत शपथ घेत नाहीत, तोपर्यंत त्यांना सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही.

विनय कोरे, जयंत पाटील, उत्तम जानकर, शेखर निकम, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर, सुनील शेळके यांनी अद्याप विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतलेली नाही. दि. ७ डिसेंबर आणि दि. ८ डिसेंबर असे दोन दिवस शपथविधीसाठी राखीव ठेवण्यात आले होते. तर, दि. ९ डिसेंबर हा दिवस विधानसभा अध्यक्षांची निवड आणि राज्यपालांच्या अभिभाषणासाठी राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या आठही आमदारांना आता विधानसभा अध्यक्षांच्या दालनात किंवा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथ घ्यावी लागेल.

दरम्यान, विशेष अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी १०६ आमदारांनी सदस्यपदाची शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

अग्रलेख
जरुर वाचा
मुंबईतील विलेपार्लेत महापालिकेने ९० वर्षांपूर्वील जैन मंदिर पाडल्याने श्रद्धाळूंची निदर्शने

मुंबईतील विलेपार्लेत महापालिकेने ९० वर्षांपूर्वील जैन मंदिर पाडल्याने श्रद्धाळूंची निदर्शने

Mumbai Municipal Corporation ने जैन मंदिर पाडल्याने जैन समाजाने एकत्र येत निदर्शने केली आहेत. मुंबईतील विलेपार्ले विभागत असणार्‍या ९० वर्षांपूर्वील जैन मंदिर पाडण्यात आले. श्री १००८ पाश्वर्थनाथ देरासर, अवैध असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. हे प्रकरण वर्षानुवर्षे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले जरी असते तरीही मंदिर समितीच्या बाजूने कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.मंदिर पाडण्याची स्थगिती देण्यासाठी भाविकांनी अंतिम क्षणी न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु कोणतीही सुनावणी ..

पुणे भूमीअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश; दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल

पुणे भूमीअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश; दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल

Chandrashekhar Bawankule पुणे जिल्ह्यातील भूमीअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराच्या एका गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे. जमिनीच्या मोजणी आणि हद्द निश्चितीच्या कामासाठी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपांनंतर भूमी अभिलेख विभागाचे उप-अधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकरमापक किरण येटोळे यांच्या विरोधात पुणे शहरातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तक्रारदाराने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रकरणाची तक्रार केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई केली...

नाशिक हिंसाचारात मविआच्या नेत्यांचा सहभाग!

नाशिक हिंसाचारात मविआच्या नेत्यांचा सहभाग!

नाशिकमधल्या काठे गल्लीतील अनधिकृत सातपीर दर्ग्याच्या पाडकामावरून झालेल्या हिंसाचारानंतर नाशिक पेटवण्याचं राजकीय कारस्थान होतं का असा प्रश्न आता निर्माण झालाय. याचं कारण म्हणजे या प्रकरणी पोलिस तपासात उघडकीस आलेलं मविआ कनेक्शन. संशयितांमध्ये काही महाविकास आघाडीच्या नेत्यांचाही समावेश असल्याचं पोलिस तपासातून समोर आलंय.आतापर्यंत जवळपास दीड हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या हिंसाचार प्रकरणातील राजकीय धागेदोरे समोर आल्यानंतर गंभीर सवाल उपस्थित होतायत. नाशिकची दंगल नेमकी कुणी भडकवली? पोलिसांवर दगडफेक..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121