भारत सरकारच्या नागरिकांना सूचना तिसर्या शहरावर बंडखोरांचा कब्जा
08-Dec-2024
Total Views | 28
दमास्कस : सीरियातील बशर-अल-असद सरकारला देशातील बंडखोर गटांनी आव्हान दिले आहे. शनिवार, दि. ७ डिसेंबर रोजी दक्षिणेकडील दारा शहरावर त्यांनी ताबा मिळवला. मागील काही दिवसांमधील बंडखोरांनी कब्जा केलेले हे तिसरे शहर आहे. मध्य-पूर्वेतील देशात सुरू असलेल्या संघर्षामुळे आता बशर-अल-असद यांच्यासाठी वाढता धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, सीरियातील बिघडलेल्या परिस्थितीबद्दल चिंतित भारत सरकारने सर्व भारतीय नागरिकांसाठी रात्री उशिरा एक सूचना जारी केली आहे. “पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांनी सीरियाला ( Syria ) जाणे पूर्णपणे टाळावे,” असा सल्ला देण्यात आला आहे.
इराण आणि रशियाच्या मदतीने बशर-अल-असद हे सीरियात सत्तेवर आहेत. त्यांचे सरकार हे इराण आणि रशियाच्या पाठबळावरच टिकून होते. अलीकडील घडामोडींमुळे सीरियातील परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. रशियाचा मागील अडीच वर्षांहून अधिक काळ युक्रेनबरोबर संघर्ष सुरू आहे. तर, इराण आणि हिजबुल्ला यांचा इस्रायलसोबत संघर्ष सुरूच आहे. अशा स्थितीत रशिया आणि इराणचे सीरियावरील नियंत्रण कमी झाले असून सीरियातील बंडखोर गटांनी याचा फायदा घेत असाद यांना मोठा धक्का दिला आहे.
केंद्र सरकारकडून सूचना जारी
सीरियातील बिघडलेल्या परिस्थितीबद्दल चिंतित भारत सरकारने सर्व भारतीय नागरिकांसाठी रात्री उशिरा एक सूचना जारी केली आहे. “पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांनी सीरियाला जाणे पूर्णपणे टाळावे,” असा सल्ला देण्यात आला आहे. आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आणि ईमेल आयडीदेखील जारी केले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने सध्या सीरियामध्ये असलेल्या सर्व भारतीयांना दमास्कसमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे. “सीरिया सोडू शकतात, त्यांनी उपलब्ध व्यावसायिक उड्डाणांद्वारे शक्य तितक्या लवकर सीरिया सोडावे,” असा सल्लाही देण्यात आला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दमास्कससाठी आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक +९६३ ९९३३८५९७३ जारी केला आहे. हा नंबर व्हॉट्स अॅपवरही वापरता येईल. यासोबत त्याने हेल.वरारीर्लीीाशर.र्सेीं.ळप हा आपत्कालीन ईमेल आयडी तयार केला आहे.