मालेगाव वोट जिहाद प्रकरणी सात ठिकाणी ईडीची छापेमारी!

किरीट सोमय्यांची माहिती

    07-Dec-2024
Total Views |
 
Kirit Somaiyya
 
मुंबई : मालेगाव वोट जिहादप्रकरणी ईडीकडून सात ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे. मालेगावमधील बँकेत कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाला असून हे पैसे वोट जिहादसाठी वापरल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.
 
हे वाचलंत का? -  'हा' तर बाबासाहेबांच्या घटनेला विरोध! जनतेला एवढं अडाणी कसं समजू शकता?
 
किरीट सोमय्या म्हणाले की, "मालेगाव वोट जिहाद या घोटाळ्यात काल ईडीने पुन्हा एकदा मुंबई, अहमदाबाद येथील सात ठिकाणी छापे मारले. यात साडे तेरा कोटी रुपयाची कॅश जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणातील मुख्य आरोपी सिराज मोहम्मदच्या खात्यात एक हजार कोटी रुपये जमा झाले. यात ५ आरोपींना अटक केली असून ७ आरोपी फरार आहेत," असे त्यांनी सांगितले. तसेच या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी पुन्हा एकदा सोमवारी मालेगावला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.