ऊर्जासंचयासाठी फ्रान्स सज्ज

Total Views |

Energy Storage
 
 फ्रान्सची 2022 मध्ये 90 मेगावॅट क्षमता होती आणि ती 2030 सापर्यंत 359 मेगावॅटपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. जागतिक स्तरावर सध्या शाश्वत ऊर्जानिर्मितीवर भर दिला जात आहे. अशावेळी पोर्तुगीज पॉवर डेव्हलपर टॅग एनर्जी ही कंपनी पॅरिसपासून, सुमारे 100 किमी पूर्वेला असलेल्या उशीपरू-Cernay-l²s-ReimsÀच्या कम्यूनमध्ये, फ्रान्सची सर्वात मोठी बॅटरी स्टोरेज सुविधा तयार करण्यासाठी ‘टेस्ला’सोबत सज्ज झाली आहे.
 
आजकाल शाश्वत ऊर्जेच्या विकासासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न होताना दिसत आहेत. पारंपरिक ऊर्जास्रोताचे मार्ग त्यागून, नाविन्याची कास धरण्याची स्पर्धा सध्या जगातील अनेक देशांमध्ये सुरू झाली आहे. वर्ष 2022 मध्ये जागतिक ऊर्जा साठवण क्षमता 36 हजार, 735 मेगावॅटपर्यंत पोहोचण्याचा अंदाज होता. तर 2030 सालापर्यंत ती 3 लाख, 53 हजार, 880 मेगावॅटपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. फ्रान्सची 2022 मध्ये 90 मेगावॅट क्षमता होती आणि ती 2030 सापर्यंत 359 मेगावॅटपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. जागतिक स्तरावर सध्या शाश्वत ऊर्जानिर्मितीवर भर दिला जात आहे. अशावेळी पोर्तुगीज पॉवर डेव्हलपर टॅग एनर्जी ही कंपनी पॅरिसपासून, सुमारे 100 किमी पूर्वेला असलेल्या उशीपरू-Cernay-l²s-ReimsÀच्या कम्यूनमध्ये, फ्रान्सची सर्वात मोठी बॅटरी स्टोरेज सुविधा तयार करण्यासाठी ‘टेस्ला’सोबत सज्ज झाली आहे.
 
हा प्रकल्प पुढील वर्षाच्या अखेरीस पूर्ण झाल्यावर, 240 मेगावॅट या सुविधेची क्षमता निर्माण होणार असून, जी आजच्या फ्रान्समधील सर्वात मोठ्या प्रणालीपेक्षा पाचपट अधिक असेल. ‘टॅग एनर्जी’ ही कंपनी ‘लो-कार्बन एनर्जी सोल्यूशन्स’मधील जागतिक स्तरावर नावाजलेली कंपनी आहे. फ्रान्सने सर्वात मोठ्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज प्लॅटफॉर्मचे बांधकाम, या कंपनीच्या माध्यमातून सुरू केले आहे. वर्ष 2025 अखेरीपर्यंत या महत्त्वाकांक्षी विस्तार योजनेच्या पूर्ततेचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ‘टेस्ला’ हा प्रकल्पातील ईपीसी कंत्राटदार आहे आणि फ्रेंच ऊर्जा बाजारपेठेतील बॅटरीचे व्यवस्थापनही करेल. उशीपरू-Cernay-l²s-ReimsÀच्या नगरपालिकेसह जमीनमालकांशी सुरुवातीच्या चर्चेनंतर, दोन वर्षांनी या प्रकल्पस्थळाच्या निरीक्षण आणि तपासणीचे काम एप्रिल 2024 मध्ये सुरू झाले होते. युरोपियन बँकांच्या एका संघाद्वारे वित्तपुरवठा केलेला हा प्रकल्प पुढील महिन्यात पूर्ण होईल. या प्रकल्पाचा उद्देश वारा आणि सौरऊर्जेपासून ऊर्जानिर्मिती सुलभ करणे आणि कमाल मागणीच्या काळात, अतिरिक्त क्षमता जोडणे हा आहे. सुमारे 5 लाख, 65 हजार लोकसंख्या असलेल्या, निवासी विजेच्या गरजांपैकी 20 टक्के गरजा हा प्रकल्प पूर्ण करेल.
 
जानेवारी 2025 मध्ये या प्रकल्पाचे बांधकाम सुरू होणार आहे. 2025 सालच्या उत्तरार्धात, ग्रीड कनेक्शन नियोजित आहे. हा प्रकल्प फ्रान्समधील ऊर्जा लॅण्डस्केपमध्ये तीन आवश्यक कार्ये पार पाडेल. यामध्ये डीकार्बोनाइज्ड विजेचा वापर ऑप्टिमाईझ करणे, सर्वाधिक मागणी कालावधीत महत्त्वपूर्ण क्षमता प्रदान करणे आणि जवळ-जवळ त्वरित प्रतिसाद क्षमतांसह ग्रिड स्थिरता वाढवणे हा याचा प्रमुख उद्देश आहे. एबीएन अमरो, नॉर्ड एलबी आणि Caisse d'Epargne सीपॅक यांचा समावेश असलेल्या बँकिंग कन्सोर्टियमद्वारे समर्थित वित्तपुरवठाद्वारे, हा बॅटरी प्रकल्प शक्य झाला आहे.
 
टॅग एनर्जीचे सीईओ फ्रँक वोइटिएझ म्हणतात, टॅग एनर्जीला ऑस्ट्रेलियात दक्षिण गोलार्धातील, सर्वात मोठ्या विंड फार्मचा पहिला टप्पा आणि युकेमधील सर्वात मोठ्या ट्रान्समिशन-कनेक्टेड बॅटरीला जोडल्याच्या प्रदीर्घ अनुभवानंतर, काही आठवड्याच फ्रान्समध्ये या प्रमुख प्रकल्पाची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. अभिनवपूर्ण वित्तपुरवठा रचनेचा उपयोग करून आणि मोठ्या प्रमाणावर स्टोरेज तैनात करून, हा प्रकल्प फ्रान्सच्या ऊर्जा सार्वभौमत्वात महत्त्वपूर्ण योगदान देईल आणि ग्रिड स्थिरता वाढवेल. फ्रान्समध्ये इतर मोठ्या प्रमाणात बॅटरी प्रकल्प सुरू आहेत. यूके डेव्हलपर हार्मनी एनर्जीने अलीकडेच ब्रिटनीमधील नॅन्टेसजवळ 100 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प तयार करण्याची घोषणा केली. फ्रेंच ऊर्जा कंपनी टोटल एनर्जीच्या मालकीची 61 मेगावॅट क्षमता असलेला सर्वात मोठा प्लांट कार्यरत आहे. ग्लोबल डेटाच्या पॉवर डेटाबेसनुसार, फ्रान्समधील क्षमतेनुसार पाच स्टोरेज प्रकल्प ठरविण्यात आले आहेत. अमरेंको-क्लॉडिया बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम, डंकर्क बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम, टोटल-मार्डिक बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम, टोटल-मार्डिक बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम, रिंगो प्रोजेक्ट-विंजेन-बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम या पाच, सद्यस्थितीत फ्रान्समधील पाच सर्वोच्च बॅटरी क्षमता असणार्‍या सिस्टीम आहेत. या नवीन प्रकल्प आणि भविष्यकालीन ऊर्जा योजनेनुसार, फ्रान्सची पवन ऊर्जा स्टोरेज क्षमतेत 150 टक्के वाढ आणि 2035 सालापर्यंत सौरक्षमतेत 300 टक्के वाढ अपेक्षित आहे.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.