‘पुष्पा २’च्या प्रीमियरला लागलं गालबोट; चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू आणि २ जण जखमी

    05-Dec-2024
Total Views | 67
 
pushpa 2
 
 
हैदराबाद : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाने सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच १०० कोटींच्या पुढे गल्ला जमवला होता. आज ५ डिसेंबर २०२४ रोजी जगभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र, ‘पुष्पा २’ची क्रेझ हैदराबादमधील प्रेक्षकांना जीवघेणी ठरली आहे.
 
हैदराबादमधील एका थिएटरमध्ये बुधवारी ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ‘पुष्पा २ : द रुल’च्या प्रीमियरचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अल्लू अर्जुनचे असंख्य चाहते मोठ्या संख्येने चित्रपटगृहाच्या परिसरात आले होते. मात्र, दुर्दैवाने या घटनेला गालबोट लागलं असून, या परिसरात मोठी चेंगराचेंगरी झाल्याचं समोर आलं आहे. या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचा नऊ वर्षांचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे. तसेच अजून २ जण देखील गंभीर जखणी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रदर्शनाच्या एक दिवस आधी आरटीसी चौकातल्या संध्या थिएटरमध्ये या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि विशेष म्हणजे या स्क्रिनिंगसाठी अभिनेता अल्लू अर्जुन आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान ही घटना घडली.
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटगृहात केवळ चित्रपट आणि मुख्य कलाकारांना पाहण्यासाठीच नव्हे तर निर्मिती टीमच्या सदस्यांना पाहण्यासाठी सुद्धा हजारो चाहते जमले होते. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त करण्यात आला होता. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज सुद्धा करावा लागला. आणि याच दरम्यान, प्रचंड गर्दीत चित्रपटगृहाचा गेटही ढासळल्याचं समोर आलं आहे.
 
सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’ चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ४०० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६३.४१ कोटी कमावले आहेत. तसेच, लवकरच ‘पुष्पा ३’ देखील येणार असल्याची घोषणा चित्रपटाच्या शेवटी करण्यात आल्यामुळे चाहतेही आनंदी झाले आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121