भातसातील पाणीपुरवठ्यात घट झाल्याने पाणी वितरणाचे नियोजन
04-Dec-2024
Total Views | 44
1
ठाणे : बृहन्मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणार्या पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे. या दुरूस्तीच्या कामामुळे बंधार्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने ठाणे महापालिकेस होणार्या पाणी पुरवठ्यातही घट झाली आहे. एकूण ३० टक्के पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे पालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात २४ तासांसाठी पाणीपुरवठा ( Water supply ) बंद ठेवून पाणी वितरणाचे नियोजन करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महापालिकेतर्फे पाणीपुरवठा करणार्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’मध्ये बिघाड झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम रविवार, दि. १ डिसेंबर रोजीपासून सुरू झाले आहे. तातडीच्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार, दि. ५ डिसेंबर रोजीपर्यंत पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे. ही दुरूस्ती आणि भातसा नदीच्या बंधार्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे एकूण ३० टक्के पाणी कपातीचा ठाणे महापालिकेस सामना करावा लागत आहे.