मराठी भाषेचा अवमान सहन करणार नाही : आमदार लोढा

    04-Dec-2024
Total Views | 58
mangal prabhat lodha

मुंबई : “मराठी ( Marathi ) भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे, आपली अस्मिता आहे. त्यामुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला, अशी सक्ती कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे. मराठी भाषेचा अवमान कदापी सहन करणार नाही,” अशी प्रतिक्रिया मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी दिली.

गिरगावातील खेतवाडीमध्ये एक मराठी महिला दुकानात गेली असता, त्या दुकानदाराने तिला मराठीत का बोलली, याचा जाब विचारला. ‘बीजेपी आया है, मारवाडी में बात करनेका। मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का,’ अशी अरेरावी दुकानदाराने केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला. त्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आमदार लोढा यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.

आमदार लोढा म्हणाले की, “भाजपचे नाव घेऊन, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबई सर्वांची आहे. परंतु, ती सर्वात आधी मराठी माणसाची आहे. त्यामुळे असा भाषिक द्वेष पसरवणार्‍या व्यक्तीवर कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे,” असे लोढा यांनी सांगितले.

अग्रलेख
जरुर वाचा
२० वर्षांच्या वक्फ संपत्तीचे भाडे जात होते पाच मुस्लिम प्रस्थापितांच्या घशात; वक्फ सुधारणा कायद्यामुळे काळाबाजार आला समोर, संबंधितांनी भाजप सरकारचे केले कौतुक!

२० वर्षांच्या वक्फ संपत्तीचे भाडे जात होते पाच मुस्लिम प्रस्थापितांच्या घशात; वक्फ सुधारणा कायद्यामुळे काळाबाजार आला समोर, संबंधितांनी भाजप सरकारचे केले कौतुक!

Waqf Board गुजरात राज्यातील असलेल्या अहमदाबादमध्ये वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) कोट्यवधि दुकानाच्या जमिनीवर अवैधपणे दुकाने बांधली होती. यावरून संबंधितांनी वक्फचे विश्वस्त असल्याचा दावा केला आणि दुकाने भाड्याने दिली आणि २० वर्षांपूर्वीचे असलेले भाडे वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित भाडे हे वक्फ बोर्डाच्या खात्यावर जाण्याऐवजी पाच व्यक्तींच्या खिशात जात असल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधित प्रकरणाची माहिती ही वक्फ बोर्डाला कळाल्याची माहिती तक्रारीत नमूद केले होते. मात्र, तरीही कारवाई करण्यात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121