शुक्रवार, दि. ६ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर!
04-Dec-2024
Total Views | 16354
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. ६ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना ही सुटी लागू राहणार आहे. बुधवारी या सुटीचे परिपत्रक काढण्यात आले.
चैत्यभूमी परिसरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त जय्यत तयारी सुरु आहे. ६ डिसेंबर रोजी राज्यभरातून मोठ्या संख्येने चैत्यभूमी येथे अनुयायी येतात. दरम्यान, त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी सार्वजनिक सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, शुक्रवारी मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार असून दादर-वरळी परिसरात २ दिवस ड्राय-डे घोषित करण्यात आला आहे.