पिकेंचा नवा ड्रामा...

    31-Dec-2024   
Total Views | 40
jan suraj party founder prashant kishore addressing bpsc candidates


सध्या बिहारमध्ये ‘बीपीएससी’ परीक्षा पुन्हा घेण्याबरोबरच अन्य काही मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. हळूहळू आंदोलनात राजकीय शक्तींनी प्रवेश केला आणि मग आंदोलन भरकटत गेले. या आंदोलनकारी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री निवासापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर लाठीचार्ज केला गेला. सरकारी संपत्तीचे नुकसान केले, तसेच आंदोलनासाठी परवानगी घेतली नसल्यामुळे अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. यादरम्यान लोकांना निवडणुका जिंकवून देण्याचा दावा करणारे आणि प्रत्यक्षात आता स्वतः राजकारणात उतरलेले प्रशांत किशोर यांनीही या आंदोलनात उडी घेतली. बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे वेध लागलेले असल्याने त्यांनी काही महिन्यांपूर्वीच ‘जनसुराज’ नावाचा राजकीय पक्ष काढला. मोठा गाजावाजा करत वेगळा पक्ष काढला मात्र, बिहारच्या राजकारणात त्यांचा पक्ष अद्यापही जम बसवू शकलेला नाही. विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व सुरुवातीला किशोर यांनी केले. मात्र, नंतर त्यांनी त्यातून काढता पाय घेतला. विद्यार्थ्यांनी ‘प्रशांत किशोर वापस जाओ,’ अशी घोषणाबाजी केली. यावेळी किशोर आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मनोज भारती यांच्यावर विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजदचे तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये राजकीय टिकेलाही जोर आला आहे. किशोर यांनी राजदवर आंदोलन दडपण्याचा आरोप केला आहे. त्यातच किशोर यांनी दि. 2 जानेवारी रोजी धरणे आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. मुळात किशोर यांच्यामुळे हे आंदोलन चिघळले असल्याचे म्हटले जात आहे. आधी आंदोलनात प्रवेश आणि नंतर पळ काढायचा. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांना ब्लॅन्केट वाटप करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. आता किशोर यांची ही ब्लॅन्केट पॉलिटिक्स बिहारमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. केजरीवालांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनीही ‘रेवडी कल्चर’चा स्वीकार केला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. आधी जेडीयूमध्ये असलेले किशोर नंतर ममतांना विजयी करण्यासाठी बंगालमध्ये गेले. इकडे नितीश कुमारांनी लांब केल्यानंतर तिकडे पुढे ममतांनीही जागा दाखवली आणि अखेरीस त्यांनी नवा पक्ष काढला. मात्र, तो वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आणि भावनांचा फायदा घेणे, अतिशय दुर्दैवी.


हायटेक महाकुंभ


उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे दि. 13 जानेवारी रोजीपासून महाकुंभाला सुरुवात होणार असून, त्यासाठी योगी सरकारने जय्यत तयारी केली आहे. विशेष म्हणजे, महाकुंभासाठी प्रशासनाने अत्याधुनिक यंत्रणांचा अतिशय उत्तमपणे वापर केला आहे. अत्याधुनिक डिजिटल प्रगतीसह सनातन परंपरेचे दर्शनही महाकुंभात होणार आहे. या महाकुंभाला 45 कोटींहून अधिक भाविक येण्याचा अंदाज आहे. देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा महाकुंभाच्या निमित्ताने दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजीपर्यंत पाहता येणार आहे. विशेष सायबर सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी 56 सायबर योद्धे व तज्ज्ञ तैनात केले जाणार आहे. फसवणूक करणार्‍या लिंक, वेबसाईट, अफवा तसेच सायबर अटॅक अशा सायबर संकटांचा सामना करण्यासाठी विशेष महाकुंभ सायबर पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली आहे. सायबर धोक्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी 40 व्हेरिएबल मेसेजिंग डिस्प्ले संपूर्ण परिसरात लावण्यात येणार आहेत. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक 1920 वरून भाविक माहिती घेऊ शकतील. ऑनलाईन धमक्यांवर सायबर तज्ज्ञ सक्रियपणे लक्ष ठेऊन आहेत. मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमेसाठी मोबाईल सायबर टीमही तैनात करण्यात आली आहे. आतापर्यंत तज्ज्ञांच्या पथकाने जवळपास 50 संशयास्पद वेबसाईट्स शोधून त्यांच्यावर कारवाई केली. दि. 10 जानेवारी ते दि. 28 फेब्रुवारी रोजीच्या या कालावधीत महाकुंभ ग्राममध्ये मुक्कामासाठी ऑनलाईन बुकिंग सुरू राहणार आहे. ‘आयआरसीटीसी’च्या वेबसाईटद्वारे आरक्षण सहज करता येते. पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी आणि सोईसाठी कुंभनगरीत प्रथमोपचार सेवा उपलब्ध राहणार असून, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे सतत देखरेख ठेवण्यात येणार आहे. सुरक्षिततेसाठी रिमोट-नियंत्रित लाईफ बॉय मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत. ही उपकरणे पाण्यातील कोणत्याही ठिकाणी लवकर पोहोचू शकतात आणि आपत्कालीन परिस्थितीत लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवू शकतात. अंडरवॉटर ड्रोन पाण्याखाली 24 तास पाळत ठेवतील.सरकारी, सामाजिक, धार्मिक संस्थांसह दहा हजारांहून अधिक संस्थांचे रेकॉर्ड डिजिटल करण्यात आले. एकूणच 144 वर्षांनंतर आलेल्या या महाकुंभाला योगी सरकारने हायटेक बनवले असून यंदाच्या कुंभाला हायटेक महाकुंभ म्हटल्यास वावगे ठरू नये.




पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.
अग्रलेख
जरुर वाचा
आगामी 5 वर्षात महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न

आगामी 5 वर्षात महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये शौर्य, प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यासह कोकण, पश्चिम घाट पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सामान्य माणसापासून परदेशी पर्यटकापर्यंत येथील सौंदर्य स्थळे पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्या दृष्टीने महापर्यटन महोत्सव महत्त्वाचा आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये ₹100 कोटींची गुंतवणूक आली तर किमान 10,000 रोजगार संधी निर्माण होतात. म्हणूनच पर्यटन ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121