भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
31-Dec-2024
Total Views | 23
मुंबई : (Chandrashekhar Bawankule) भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी विधानसभा विजयाबद्दल बावनकुळेंचे अभिनंदन केले.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पंतप्रधानांची दिल्लीत भेट घेतली. कोराडी येथील आई महालक्ष्मी जगदंबेची काष्ठशिल्पातील मूर्ती त्यांनी पंतप्रधानांना भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, देशाचे लाडके पंतप्रधान, युगपुरुष नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. आई जगदंबेच्या दर्शनासाठी आपण यावे, अशी विनंती त्यांना यावेळी केली.
देशाचे लाडके पंतप्रधान, युगपुरुष आदरणीय श्री. @narendramodi जी यांची नवी दिल्लीत सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
या भेटीप्रसंगी कोराडी येथील आई महालक्ष्मी जगदंबेची काष्ठशिल्पातील मूर्ती आदरणीय पंतप्रधानांना भेट दिली.
महाराष्ट्रातील जनतेच्या भक्कम पाठिंब्यावर राज्यात भाजप- महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाले आहे. पुढील काळात पक्षसंघटन अधिक मजबूत करून सरकारचा कारभार पारदर्शी आणि अधिक गतिमान करावा याबद्दल मोदीजींनी मार्गदर्शन केले. त्यांची भेट आणि त्यांचे मार्गदर्शन नेहमी नवी ऊर्जा देणारे असते. ही अनुभूती आज पुन्हा एकदा आली, असे बावनकुळे म्हणाले.