वाल्मिक कराड सीआयडीपुढे शरण येणार? तीन पथके शोधासाठी रवाना
31-Dec-2024
Total Views | 41
पुणे : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून यातील फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, वाल्मिक कराडच्या शोधासाठी सीआडीची तीन पथके पुण्यातून रवाना झाल्याची माहिती पुढे आली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील चार आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची ९ पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय २ कोटींच्या खंडणीप्रकरणी वाल्मिक कराडदेखील फरार आहे. दरम्यान, वाल्मिक कराड मंगळवारी शरणागती पत्करणार असल्याच्याही चर्चा आहे. त्यादृष्टीने सीआयडी कार्यालयाच्या बाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.