मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Chinmay Krishna Das Health) बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर येथील इस्लामिक कट्टरपंथींकडून हिंदू अल्पसंख्याकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न मोठ्याप्रमाणात झाला. इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा खोटा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिन्मय कृष्ण दास यांची प्रकृती गंभीर असून वैद्यकीय सेवाही नाकारली जात आहे. त्यामुळे बांगलादेशी हिंदू गट आता चिन्मय कृष्ण दास यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याबाबत साऱ्या जगाला आवाहन करत आहे.
हे वाचलंत का? : २०२४ ठरले राष्ट्रसंकल्पाचे वर्ष : राम मंदिर ते विकसित भारत २०४७
बांगलादेशी बंगाली हिंदू अधिकार गट 'बांगलादेश शोमिलितो सनातन जागरण जोते' यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, चिन्मय कृष्ण प्रभू यांची प्रकृती गंभीर असून त्यांना सरकारकडून योग्य उपचार मिळत नाहीत. त्यांना दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे ते लवकर बरे व्हावे, याकरीता बांगलादेशातील प्रत्येक मंदिरात दि. १ जानेवारी २०२५ रोजी प्रार्थना करण्यात येणार आहे.