शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीचा अपघात!

    30-Dec-2024
Total Views | 132

ravindra waikar
 
मुंबई : (MP Ravindra Waikar) शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीचा किरकोळ अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातावेळी खासदार रवींद्र वायकर हे गाडीतच असल्याचे समजते आहे.
 
जोगेश्वरी येथे मुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गावर रविवारी २९ डिसेंबरला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला एका ट्रकचालकाने धडक दिली. जोगेश्वरी परिसरातील एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळच ही घटना घडली आहे. तसेच या अपघातात कोणालाही इजा झालेली नसून गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे. या प्रकरणी खासदार रवींद्र वायकर यांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
 
संबंधित घटनेची माहिती मिळताच वनराई पोलीसांनी घटनास्थळी जाऊन ट्रक आणि ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. वळण घेत असताना एक बाईक आडवी आल्याने ट्रक वायकरांच्या गाडीला धडकला असल्याचे ट्रकचालकाने चौकशीदरम्यान सांगितले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121