लष्करी तंत्रज्ञानावर प्रभुत्व असणे ही काळाची गरज : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
30-Dec-2024
Total Views | 32
1
नवी दिल्ली : आजच्या सतत बदलणाऱ्या काळात लष्करी तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्या सैनिकांना सुसज्ज आणि सज्ज करण्यात लष्करी प्रशिक्षण केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh ) यांनी मध्य प्रदेशातील महू येथील आर्मी वॉर कॉलेजमधील अधिकाऱ्यांना संबोधित करताना केले आहे.
युद्धाच्या पद्धतींमध्ये होत असलेल्या आमूलाग्र बदलांवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, माहिती युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित युद्ध, प्रॉक्सी वॉर, इलेक्ट्रो-मॅग्नेटिक वॉर, स्पेस वॉरफेअर आणि सायबर हल्ले या अपारंपरिक पद्धती आज उदयास येत आहेत एक मोठे आव्हान सादर करत आहे. अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी लष्कर अधिक प्रशिक्षित आणि सुसज्ज असले पाहिजे. बदलत्या काळानुसार त्यांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात सातत्याने सुधारणा करण्यासाठी आणि प्रत्येक प्रकारच्या आव्हानासाठी कर्मचाऱ्यांना तयार करण्याच्या प्रयत्नांविषयी त्यांनी प्रशिक्षण केंद्रांचे कौतुक केले.
संरक्षणमंत्र्यांनी तिन्ही सेवांमधील एकात्मता आणि सामंजस्य बळकट करण्याच्या सरकारच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला आणि सशस्त्र दल आगामी काळात अधिक चांगल्या आणि कार्यक्षमतेने आव्हानांचा सामना करण्यास सक्षम असेल असा विश्वास व्यक्त केला. महू कॅन्टोन्मेंटमध्ये सर्व शाखांच्या अधिकाऱ्यांना उच्चस्तरीय प्रशिक्षण दिले जाते, याबद्दल त्यांनी कौतुक केले. त्यांनी इन्फंट्री स्कूलमधील अधिकाऱ्यांकडून शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतले; मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंमधील एआय आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सारख्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षणाद्वारे कनिष्ठ आणि वरिष्ठ कमांडमध्ये नेतृत्व करून एकात्मतेला चालना देण्याची शक्यता शोधण्याचा आग्रह संरक्षण मंत्र्यांनी यावेळी केला.
विष्यात काही अधिकारी संरक्षण अटॅचेस म्हणून काम करतील आणि त्यांनी जागतिक स्तरावर राष्ट्रीय हितसंबंध जपण्यासाठी प्रयत्न करावेत. ते पुढे म्हणाले, जेव्हा तुम्ही संरक्षण अटॅचेसचे हे पद स्वीकारता तेव्हा तुम्ही सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत'च्या दृष्टिकोनाचे पालन केले पाहिजे. केवळ स्वावलंबीतेद्वारेच भारत आपल्या संरक्षण क्षमता मजबूत करू शकतो आणि जागतिक स्तरावर अधिक आदर मिळवू शकतो, असेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी नमूद केले आहे.