बीड : (MLA Suresh Dhas) अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. "प्राजक्ता माळींबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. कुणाचेही मन दुखावले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो", असे सुरेश धस म्हणाले.
काय म्हणाले सुरेश धस ?
माध्यमांशी संवाद साधताना आ. धस म्हणाले, "प्राजक्ता माळींबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबत बोलण्याचा विषयच नव्हता. मी प्राजक्ता माळींसह सर्व स्त्रियांविषयी आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन दुखावले असेल, तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो", असे धस यांनी स्पष्ट केले.