वाल्मिक कराडची बँक खाती गोठवली! पत्नीची सीआडीकडून चौकशी
30-Dec-2024
Total Views | 118
बीड : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप करण्यात येत असून आता त्याची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. यातील मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड फरार असून त्याचा शोध घेणे सुरु आहे. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी पथके तयार करण्यात आली आहेत.
या घटनेने सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तसेच या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, आता वाल्मिक कराडसह चार जणांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.