दक्षिण कोरियाच्या विमान अपघातात ८५ जणांचा मृत्यू!

अपघाताचा चित्तथरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

    29-Dec-2024
Total Views | 134
   
south korea
 
सोल: तब्बल १८१ जणांना घेऊन जाणारे विमान, दक्षिण कोरियाच्या मुआन विमानतळावर कोसळल्याची धक्कादायक घटना २९ डिसेंबरच्या सकाळी घडली आहे. बँगकोकवरून मुआन विमानतळाच्या धावपट्टीवर उतरणारे विमानाला पक्षाने धडक दिल्यानंतर ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. विमानाच्या लँडींग गिअरमध्ये बिघाड झाल्यानंतर कोसळतानाच धावपट्टीवर एक भला मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळेच अनेकांचा मृत्यू झाला आहे.

मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दक्षिण कोरियाच्या दक्षिणपश्चिम भागात स्थित विमानतळ आहे. दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या ३२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. विमानात नेमका कुठल्या प्रकारची दुर्घटना झाली हे शोधण्यासाठी एक पथक तातडीने रवाना झाले आहे. दक्षिण कोरियाचे कार्यवाहक अध्यक्ष चोई संग-मोक यांनी तातडीने सर्व संसाधनांचा वापर करत लोकांना वाचवण्याचे निर्देश दिले आहेत. २००७ सालानंतर, दक्षिण कोरियाची जेजु एअर या संस्थेसाठी ही दुसरी सर्वात मोठी दुर्घटना घडली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121