मुंबई, दि. २८ : विशेष प्रतिनिधी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडचे नामांतर आता नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड असे करण्यात आले आहे. याबाबत कंपनीने स्पष्टीकरण देताना सांगितले की, 'नवभारत हे नाव, ज्याचा अर्थ "नवीन भारत" आहे, हे या प्रकल्पाच्या माध्यमातून धारावीकरांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या प्रचंड क्षमतेचे प्रतिबिंब आहे.'
आशियातील सर्वात मोठ्या झोपडीपट्टी, धारावीचा कायापालट धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणार आहे. या पुनर्विकासासाठी राज्य सरकार आणि अदानी समुह यांच्या संयुक्त भागीदारीत धारावी रिडेव्हलमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) नावाची कंपनी स्थापन करण्यात आली आहे. मात्र आता या कंपनीचे नाव डीआरपीपीएलऐवजी एनएमडीपीएल करण्यात आले आहे. याबाबत कंपनीने सांगितले की, धारावीतील सुधारणेची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेणारी कंपनी, सर्वांगीण मूल्य प्रस्तावना आणि कॉर्पोरेट व्हिजनच्या नूतनीकरणाला प्रतिसाद म्हणून स्वतःचे पुनर्ब्रँडिंग करत आहे. कंपनीचे नाव बदलणे हे रीब्रँडिंगच्या केंद्रस्थानी आहे. नवभारत मेगा डेव्हलपर्स या नावाला संचालक मंडळाची आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची संमती मिळाली आहे. हा बदल देशभरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याच्या अवाढव्य आणि ऐतिहासिक कार्याशी संबंधित किंवा लाभार्थी असलेल्या प्रत्येकासाठी एक व्यापक आणि उज्वल भविष्य निर्माण करण्याचा कंपनीचा नवीन दृष्टिकोन आणि दायित्व प्रतिबिंबित करतो.
एनएमडीपीएल हे महाराष्ट्र सरकार-धारावी पुनर्विकास प्रकल्प / झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) आणि अदानी समूह यांच्यातील एक विशेष उद्देश वाहन आहे. नावातील बदलामुळे सरकारची महत्त्वाची भूमिका किंवा प्रकल्पाचा मूळ उद्देश बदललेला नाही. हा उपक्रम डीआरपीपीएलचे नाव बदलण्यासाठी नाही तर एक सारखे नाव असल्याने चूक होऊ नये यासाठीही आहे. डीआरपी (धारावी पुनर्विकास प्राधिकरण)हे महाराष्ट्र शासनाची धारावीच्या पुनर्विकासाशी संबंधित विशेष नियोजन प्राधिकरण आहे. महाराष्ट्र सरकारची भूमिका अपरिवर्तित राहिली आहे आणि महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी डीआरपी हे पर्यवेक्षण प्राधिकरण आहे,असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूह यांचा भारत झोपडपट्टीमुक्त होण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयावर काम करत असताना, धारावीचा पुनर्विकास हे त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.