आयरे गावातील जनजातींची संकल्प पूर्ती

"हनुमान मंदिर" प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण सोहळा दिमाख्यात संपन्न

    27-Dec-2024
Total Views |

Aayare Village Hanuman Mandir Pranpratishtha

मुंबई (ओंकार मुळ्ये) : (Aayare Village Hanuman Mandir) 
पालघर जिल्ह्यातील केशव सांस्कृतिक मंडळच्या सहकाऱ्याने आयरे गावातील (ता. जव्हार) श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण सोहळा गुरुवार, दि. २६ डिसेंबर रोजी संपन्न झाला. बंगळूरचे बालयोगी महंत श्रीगणेशदासजी (उदासीन) यांच्या शुभहस्ते हनुमंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंदिरात करण्यात आली.

कर्मयोगी कै. सोनूबाबा यांनी आयरे गावात आधी हे मंदिर बांधले होते. कालांतरने ते जीर्ण होत गेले. 'अयोध्येत राम मंदिर होऊ शकते मग आपल्या गावात हनुमंताचे मंदिर का होऊ शकत नाही', असा प्रश्न जेव्हा गावकऱ्यांना पडला तेव्हा त्यांनी याच मंदिराचा जीर्णोद्धार करायचा संकल्प केला.

हे वाचलंत का? : मंदिरे सरकार नियंत्रणातून मुक्त करा; आगामी दिवसात 'विश्व हिंदू परिषद'चे विशेष अभियान

यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पालघर जिल्हा संघचालक नरेश मराड उपस्थित होते. प्रत्येक जनजाती (आदिवासी) हा हिंदूच आहे याबाबत त्यांनी उतस्थितांना मार्गदर्शन केले. "जनजातींची ओळख केवळ निसर्ग पूजक नसून ते हिंदूही आहेत. कारण सनातन हिंदू धर्मही तितकाच निसर्ग पूजक आहे. वास्तविक जनजातींच्याच मदतीने श्रीरामांनी लंकेवर स्वारी करून रावणाचा वध केला. जर जनजातींचा तेव्हा पासून रामायणाशी, हनुमंताशी संबंध असेल तर मग ते हिंदू का नाहीत. जनजाती समाजाला तोडायचं काम काही अधर्मीय करत आहेत. यातूनच पुढे साधू हत्याकांड सारख्या गोष्टी घडतात.", असे ते म्हणाले.


Aayare Village Hanuman Mandir

या सोहळ्या दरम्यान संपूर्ण आयरे गाव भगवे झेंडे, पताक्यांनी सजले होते. गावातील एकूण पाच दाम्पत्यांना प्राणप्रतिष्ठा पूजेचा मान मिळाला होता. गावातील लहान मुलांपासून ते वडीलधाऱ्यांपर्यंत सर्वांची उपस्थिती या वेळेस होती. आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाचा शेवट झाला. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन प्रा. प्रमोद थालकर सर यांनी केले.

प्रत्येक गावात एक मंदिर असावे
आयरे सारख्या डोंगराळ भागातील गावकऱ्यांनी केलेला संकल्प पूर्ण करून दाखवला. प्रत्येक गावात एक मंदिर असावे. त्यामुळे गावाला एक संस्कार, ध्येय, शक्ती मिळते. परमेश्वराचे नामस्मरण केल्याशिवाय काही साध्य होत नाही. आपण याच हनुमंताचे भक्त आहोत आणि याची सेवा करणे आपले कर्तव्य आहे.
- हरिश्चंद्र भोये, आमदार, विक्रमगड मतदारसंघ, भाजप

गावकऱ्यांनी केलेल्या संकल्पाची ही फलश्रुती
आयरे गावातील गावकाऱ्यांनी पै-पै जमवून हे मंदिर उभे करून दाखवले आहे. ५-६ महिन्यात मंदिर उभं राहिलं. मंदिराच्या माध्यमातून गावचा विकास नक्की होईल असा विश्वास आहे. गावकऱ्यांनी केलेल्या संकल्पाची ही फलश्रुती आहे. वडिलोपार्जित स्वप्न साकार झाले.
- वीरेंद्र चंपानेरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रगती प्रतिष्ठान

अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

ED काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी संबंधित असणार्‍या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी कार्यवाहीस सुरूवात केली. या मालमत्तेत दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख असणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे. काँग्रेसच्या संबंधित असणाऱ्या कंपनीशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीकडे ६०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी देशाची राजधानी दिल्लीतून बहादूर शाह जाफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊस आहे...

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121