मुंबई : मराठी 'बिग बॉस’ सीझन ५ चा विजेता सुरज चव्हाण सध्या प्रचंड चर्चेत आहे. एकीकडे त्याच्या हक्काच्या घराचं स्वप्न पुर्ण झालं. तर दुसरीकडे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुरजला चित्रपटात काम करण्याची संधी देणार हा दिलेला शब्द पुर्ण केला आहे. ‘झापुक झुपूक हा सुरज चव्हाणचा नवा चित्रपट लवकरच येणार असून चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे.
सूरज चव्हाण 'झापुक झुपूक' या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. दरम्यान, या चित्रपटात दीपाली पानसरे, जुई भागवत पायल जाधव हे कालाकार पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि बेला केदार शिंदे करणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे करणार आहेत.