हृतिक रोशनचा ‘क्रिश ४’ कधी येणार? 'या' महिन्यात शूटिंगला सुरुवात होणार

    26-Dec-2024
Total Views | 48
 
krrish
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील लहान मुलांचा आवडता सुपरहिरो म्हणजे क्रिश. ह्रतिक रोशन याने क्रिश चित्रपटात साकारलेली भूमिका आजही तितकीच आवडते. आणि आता याच चित्रपटाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्यावर्षी 'क्रिश' फ्रँचायझीचा चौथा भाग येणार अशी घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच चाहते 'क्रिश ४’ च्या प्रतिक्षेत आहेत. राकेश रोशन यांनी काही दिवसांपूर्वी दिग्दर्शनातून निवृत्ती जाहीर केली असल्यामुळे क्रिश ४ येणार की नाही अशीच शंका निर्माण झाली होती. पण आता लवकरच क्रिश ४ येणार असून चित्रिकरण देखील लवकर सुरु होणार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, हृतिक रोशन 'क्रिश ४' चं शूटींग २०२५ मध्ये सुरु करणार आहे. 'क्रिश ३' २०१३ मध्ये प्रदर्शित आला होता. आता ११ वर्षांनंतर 'क्रिश ४' येणार असून या चित्रपटाची निर्मिती हतिक रोशनचे वडील राकेश रोशन करणार आहेत तर करण मल्होत्रा दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.
 
दरम्यान, 'क्रिश ४' आधी हृतिक रोशनचा 'वॉर २' येणार आहे. सध्या तो याच चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. विशेष म्हणजे यामध्ये साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचीही भूमिका असून या चित्रपटात एनटीआर हिंदी चित्रपटसृश्टीत पदार्पण करणार आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121