अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली पुष्पांजली

    25-Dec-2024
Total Views | 29

Atal Bihari Vajpayee
नवी दिल्ली : भाजपचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee)  यांची दि: २५ डिसेंबर २०२४ रोजी १०० वी जयंती आहे. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील सदैव अटल स्मारक येथे जाऊन अटल बिहरी वाजपेयी यांना पुष्पांजली वाहिली आहे.
अटलजींच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींसह राष्ट्रपती दौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अटलजींच्या स्मारकाला नसमस्तक होत पुष्पांजली वाहिली आहे.
 
 
 
दरम्यान अटलजी यांनी आपल्या कारकिर्दीत सुरूवातीला पत्रकारीतेचे शिक्षण घेतले होते. मात्र नंतर त्यांनी जनसंघ या पक्षात प्रवेश करत समाजकारणाला प्राधान्य दिले. त्यानंतर जनसंघ संघटना ही भारतीय जनता पक्ष म्हणून ओळखू लागला. अटलींना कविता, वाचन आणि लिखाणाची विशेष आवड होती. अनेकदा संसदेत त्यांनी आपल्या कवितेतून देशाप्रती प्रेम भावना व्यक्त केली.
कितीही सत्ता येतील आणि जातील मात्र लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, हे त्यांचे वाक्य आजच्या राजकीय परिस्थितीसाठी चपखल ठरत आहे. दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून ते वेगवेगळ्या वेळी खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तीन वेळा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान म्हणून निवडून आले होते. अनेक दशकांनंतरही त्यांच्या कामाची व्यप्ती आणि कामाचा व्यासंग आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121