जागतीक वनीकरणासाठी युपीच्या चार शेतकऱ्यांची "विश्व पदयात्रा"
२३ ते २८ डिसेंबर या कालावधीत ठाण्यात जनजागरण
24-Dec-2024
Total Views | 61
ठाणे : पर्यावरण संवर्धनासाठी उत्तर प्रदेशातील (युपी) चार तरुण जगाला संदेश देण्यासाठी जगभ्रमंतीवर निघाले आहेत. युपीतील एका लहान गावातील हे चारही तरूण शेतकरी ( UP Farmer ) असुन मानवतेच्या भविष्यासाठी त्यांनी 'विश्व पदयात्रा' काढून जागतिक वनीकरण मिशन सुरू केले आहे. २३ ते २८ डिसेंबर या कालावधीत हे तरूण ठाणे जिल्हयात जनजागरण करणार आहेत.
गिनीज तसेच लिम्का बुकमध्ये नोंद झालेल्या अवध बिहारी लाल हे १९८० पासुन पर्यावरणासाठी पदयात्रेला निघाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २००१ पासून उत्तर प्रदेशातील जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप, गोविंदा नंद आणि निश्चल मौर्य हे चार तरुण शेतकरी जगभरातील नागरिकांना पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यासाठी निघाले आहेत. त्यांच्या टीममध्ये आता २० सदस्यांपर्यंत पोहचली असून ही टीम सध्या महाराष्ट्राच्या विविध भागातून पुढे पुढे जात आहे. पालघर मधून ठाण्यात दाखल झालेल्या या चार शेतकऱ्यांचे वय ३० ते ३८ वर्षे आहे. हे सर्व शेतकरी आज पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जगभरातील लोकांना "झाडे लावा, पृथ्वी वाचवा" असा संदेश देत आहेत. या शेतकऱ्यांनी ११ देशांचा दौरा केला असून ४.४८ लाख किलोमीटरची पायपीट करून ६०० जिल्ह्यांमध्ये १४.५० कोटी वृक्षांची लागवड केली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजना बरोबरच हे तरूण पर्यावरणाचे रक्षण करा, झाडे लावा, पृथ्वी वाचवा, नद्यांचे संरक्षण करा, मुली वाचवा - मुली शिकवा, रस्त्याची सुरक्षा, पाणी जपा आणि स्वच्छ भारत मिशन आदींची जनजागृती शाळा - महाविद्यालयामधुन करीत आहेत.