चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली!

गुजरातहून अकोल्याकडे जाणाऱ्या बसचा अपघात

    24-Dec-2024
Total Views | 47
 
JALGAON  
 
जळगाव : (Jalgaon Accident News) गुजरातहून अकोल्याकडे जाणाऱ्या लक्झरी बसचा जळगावजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील वराडसीम गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत एक महिला जागीच ठार तर, पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली!
 
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गुजरात राज्यातील सुरत येथून ही लक्झरी बस एरंडोल मार्गे मलकापूर येथे जात होती. लक्झरी बसवर साड्यांचे मोठे गाठोडे ठेवण्यात आले होते. धरणगाव तालुक्यातील वराडसीम गावाजवळ साड्यांचे गाठोडे एका बाजूला सरकल्याने चालकाचे लक्झरी बसवरील नियंत्रण सुटले.
 
चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर लक्झरी बस डिव्हायडर ओलांडून रस्त्याच्या पलीकडे जाऊन उलटली. या अपघातात एक महिला जागीच ठार तर, दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. कविता सिद्धार्थ नरवाडे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सोपान नारायण सपकाळ, विठ्ठल अमृत कोगदे, विश्वनाथ नामदेव वाघमारे, प्रशांत गजानन धांडे यांच्यासह दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदतकार्य केले. जखमींना खासगी वाहनातून जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121