'हमासचा म्होरक्या आम्हीच संपवला!' पहिल्यांदाच इस्रायलने दिली कबुली
मिसाईल हल्ल्यानंतर हुथी बंडखोरांना इशारा
24-Dec-2024
Total Views | 62
तेल अवीव: कट्टरपंथी आणि दहशतवादी संघटनांचा कर्दनकाळ असणाऱ्या इस्रायलने पहिल्यांदाच आपल्या कामाची कबुली दिली आहे. २३ डिसेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधताना इस्रायलचे सुरक्षा मंत्री इस्रायल कर्झ म्हणाले की हमासचा म्हरोक्या इस्माईल हनीयेह याला संपवण्यात आमचाच हात होता. येमेनच्या हुथी बंडखोरांना इशारा देत कर्झ म्हणाले की त्यांच्या विरोधात देखील अशीत कठोर कारवाई केली जाईल.
हमास आणि हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनांच्या विरोधात काही महिन्यांपूर्वी इस्रायलने आघाडी उघडली होती. यामध्ये दोन्ही संघटनांच्या प्रमुख दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात इस्रायलला यश आले होते. पूर्णपणे या दहशतवादी संघटना संपल्या नसल्या, तरी युद्धाच्या आघाडीवर त्यांचा निर्णायक पराभव करण्यात इस्रायलला यश आले आहे. २१ डिसेंबर रोजी हथी बंडखोरांना तेल अवीववर मिसाईल हल्ला केला. या हल्ल्यामध्ये किमान १६ जणं जखमी झाले. येमेनच्या बंडखोरांना इशारा देत, त्यांची गत सुद्धा हमास, हिजबुल्लाह सारखी होईल असे सुरक्षा मंत्र्यांनी सांगितले आहे.
सीरीयाचे तक्त पालटले!
सीरीया देश मागचे दशकभर यादवी युद्धात धुमसत होता. बशर अल-अस्साद यांच्या घराण्याची सत्ता गेले अनेक दशकं तिथे होती. परंतु ८ डिसेंबर रोजी अस्साद यांनी सीरीयातून पळ काढला व ते रशिया येथे वास्तव्यास गेले. सीरीयाच्या बंडखोरांनी राजधानी दमस्कसवर ताबा मिळवला, त्याच सोबत अध्यक्ष. बशर अल-अस्साद यांची राजवट उलथवून टाकल्याची माहिती सीरीयाच्या सरकारी वाहिनीवरून जाहीर केले. सीरीयाचे तक्त पालटण्यात इस्रायलचा हात होता अशी कबुली सुरक्षा मंत्री इस्रायल कर्झ यांनी दिली.