नवी दिल्ली : बुद्धिबळपटू डी गुकेश याच्या विजयाने सर्व भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. परिश्रम आणि जिद्द यांच्या संगमाने विजय खेचून आणता येतो, हे त्याने दाखवून दिले. परंतु या व्यतिरीक्त खेळाडूंना आवश्यकता असते ती पोषक वातावरणाची, जी तयार करण्याची जबाबदारी देशातल्या राज्य सरकारची असते. अशातच दिल्लीचे आम आदमी पक्षाचे सरकार या कामामध्ये कसे अपयशी ठरले आहे, याचा दाखला समोर आला आहे. बुद्धिबळपटू तानिया सचदेव यांची दिल्ली सरकारवर टीका करत म्हटले आहे की दिल्लीच्या आप सरकारने आम्हा बुद्धिबळ खेळणाऱ्या खेळाडूंना वाऱ्यावर सोडले आहे.
तानिया सचदेव यांनी आपल्या X हँडल वर या बद्दल पोस्ट केलीआहे. त्या म्हणाल्या की २००८ पासून मी भारतासाठी बुद्धिबळ खेळत आहे. परंतु आमच्या खेळाला दिल्ली सरकारकडून अजिबात सहकार्य केले गेले नाही. इथली परिस्थीती अत्यंत निराशाजनक आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी ही गोष्ट अधोरेखित केली की इतर राज्य सरकारांच्या पाठिंब्याने त्यांच्या खेळाडूंना बुद्धिबळात चांगले यश मिळविण्यास प्रवृत्त केले, परंतु दिल्ली सरकार कडून असा कुठलाही प्रयत्न झाला नाही.तानिया सचदेवने २०२२च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सांघिक कांस्य पदक जिंकले होते. त्याच्या जोडीला त्यांनी वैयक्तीक पदक सुद्धा जिंकले. २०२४ मध्ये त्यांनी आपल्या खेळात भरारी घेत बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधे सुर्वण पदक जिंकले. तथापि, दिल्लीतल्या आम आदमी पक्षाच्या सरकारने अजूनही तिच्या कामाची दखल घेतली नाही.