शालीची विक्री करण्याचा बहाणा करत होता जावेद मुन्शी, अखेर प.बंगाल येथे झाली अटक
23-Dec-2024
Total Views | 112
कोलकाता : पाकिस्तानात दहशतवादाचे प्रशिक्षण घेऊन २०११ मध्ये जम्मू-काश्मीर येथे मौलानाच्या हत्येप्रकरणी मोस्ट वाँटेड असलेल्या जावेद मुन्शी या दहशतवाद्याला पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कॅनिंग परिसरातून अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर आणि प.बंगाल पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही अटक करण्यात आली आहे.
संबंधित दहशतवादी हा तहरीक-उल-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता. यावेळी जावेद मुन्शी शाल विक्रेता म्हणून कनिंग येथे पोहोचला होता असे सांगण्यात येत आहे. तो नदीमार्गे बांगलादेशाकडे जाण्याच्या प्रयत्नात होता. शस्त्रे आणि स्फोटके बनवण्यासाठी जावेद मुन्शी तरबेज होता.
रविवारी २२ डिसेंबर २०२४ रोजी पोलिसांनी जावेद मुन्शीला गुलशन हाऊस नावाच्या भाड्याच्या घरातून पकडण्यात आले. ज्याठिकाणी तो त्याचा नातेवाईक तबस्सुम बीवी आणि तिचा पती गुलाम मोहम्मदोसबत राहत होता. यावेळी त्याच्या नातेवाईकाने सांगितले की, मुन्शी हा तिच्या बहिणीचा नवरा आहे आणि गेल्या २५ वर्षांपासून त्याच्या कुटुंबाचा एका भाग आहे.
मुन्शीने कोलकाता येथील अलीपूर न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे न्यायालयाने त्याला ट्रानि्झिट रिमांडवर जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच संबंधित दहशतवाद्याला श्रीनगर येथे दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावेद मुन्शीने पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशात अनेक दौरे केले असून यामध्ये बनावट पाकिस्तानी पासपोर्टचा वापर केल्याचे तपासातून समोर आले आहे. याच दहशतवादी कारवायांमुळे तो अनेकदा तुरूंगात केल्याची माहिती समोर आली आहे.