चिपळूणात पट्टेरी वाघाचा वावर; सह्याद्रीतील 'हा' वाघ कोकणात उतरल्याची शक्यता

    21-Dec-2024
Total Views | 656
tiger spotted in chiplun



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात वाघाच्या वावरावर शिक्कामोर्तब झाले आहे (tiger spotted in chiplun). तालुक्यातील एका गावात वाघाचा वावर आढळला असून वन विभागाने कॅमेरा ट्रॅप लावले आहेत (tiger spotted in chiplun). याठिकाणी वाघाच्या पावलांचे ठसे मिळाले असून त्याने म्हैस देखील मारली आहे. (tiger spotted in chiplun)
 
 
 
सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गाचा विस्तार हा महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडे कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत आहे. या भ्रमणमार्गातील महाराष्ट्रातील सह्याद्रीमध्ये १२ वाघांचा वावर आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा विचार केला असता, याठिकाणी 'एसटीआर-टी १' आणि 'एसटीआर - टी २' अशा दोन वाघांचा वावर आहे. अशा परिस्थितीत आता चिपळूण तालुक्यातील एका गावामध्ये वाघाचा वावर निदर्शनास आला आहे. गावातील म्हैस वाघाने मारली असून त्याठिकाणी पावलांचे ठसे देखील आढळून आले आहेत. म्हशीला खाण्याची पद्धत आणि पावलांच्या ठशांचा आकार हा पाहता, तो वाघच असण्यावर शिक्कामोर्तब झाले देखील. तरी देखील वन विभागाने याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. त्यामुळे छायाचित्र मिळाल्यानंतरच वाघाच्या वावर ठोस पद्धतीने समोर येईल. दरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील 'एसटीआर-टी १' हा वाघ खाली कोकणात उतरल्याची शक्यता व्याघ्र प्रकल्प प्रशासनातील एका सूत्राने व्यक्त केली आहे.
 
 
 
१० हजार ७८५ चौ.किलोमीटर क्षेत्रावर सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गाचा विस्तार पाहायला मिळतो. या भ्रमणमार्गच्या क्षेत्रामध्ये संरक्षित वनक्षेत्राबरोबरच खासगी आणि सरकारी मालकीच क्षेत्र, गाव, महामार्ग, रेल्वेमार्ग, धरण अशा अनेक गोष्टीचा समावेश आहे. त्यामुळे या भ्रमणमार्गात अनेक ठिकाणी आपल्याला खंड म्हणजेच 'गॅप' आणि अडथळे म्हणजेच 'बाॅटलनेक' दिसतात. अशा परिस्थितीत असलेल्या या भूभागामधील वाघांच्या संख्येचे अवलोकन करण्याचे काम 'डब्लूसीटी'ने वन विभागाच्या मदतीने २०२२-२३ या सालात केले. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये हा अभ्यास केंद्रित होता आणि या अहवालातील गोवा व कर्नाटक राज्यातील वाघांची संख्या ही 'राष्ट्रीय व्याघ्र गणने'च्या अहवालामधून घेण्यात आली. कर्नाटकमधील १७ आणि गोव्यातील ५ वाघांची संख्या ही राष्ट्रीय व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार नोंदवण्यात आली, तर महाराष्ट्रामधून १२ वाघांच्या छायाचित्रांची नोंद करण्यात आली आहे. ही संख्या केवळ भ्रमणमार्ग भूप्रदेशातील असून 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्प' किंवा 'राधानगरी वन्यजीव अभयारण्या'सारख्या संरक्षित वन क्षेत्रामधील वाघांच्या संख्येचा यात समावेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

तहव्वूर राणाच्या एनआयए चौकशीला सुरुवात! एनआयए मुख्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ; फक्त १२ अधिकाऱ्यांनाच चौकशी कक्षात प्रवेश

(Tahawwur Rana's NIA Interrogation Begins) २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. गुरुवारी १० एप्रिलला रात्री राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशीला सुरुवात झाली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121