वसई-विरार जिल्ह्यात भाजपसाठी ५ लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्य

    02-Dec-2024
Total Views | 35
BJP

कल्याण : भारतीय जनता पक्षातर्फे आगामी काळात संपूर्ण भारतभर सदस्य ‘नोंदणी अभियान’ ( BJP Members ) राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये वसई-विरार जिल्ह्यातून किमान पाच लाख सदस्य नोंदणीचे करण्याचे आवाहन भाजपच्या संघटन पर्व २०२४ सदस्य नोंदणी मोहिमेचे प्रदेश सहसंयोजक, माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले आहे. या सदस्य नोंदणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नालासोपारा येथे झालेल्या वसई-विरार जिल्ह्याच्या प्राथमिक बैठकीत त्यांनी पाच लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्य निर्धारित केले.

“येत्या काही महिन्यांमध्ये महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. आधी लोकसभा निवडणुकांतील विजय, त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निर्भेळ यश पाहता येणार्‍या महापालिका निवडणुकांमध्येही भारतीय जनता पक्षाची अशीच विजयी घोडदौड कायम राहणे आवश्यक आहे,” असे मत नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
या पार्श्वभूमीवर राज्यात प्रदेश भाजपतर्फे संघटन पर्व-२०२४ या सदस्य नोंदणी मोहिमेला प्रारंभ होत आहे. या मोहिमेमध्ये भाजपच्या वसई-विरार जिल्ह्यातून किमान पाच लाख सदस्य नोंदणीचे लक्ष्य गाठण्याचे आवाहन नरेंद्र पवार यांनी या बैठकीत केले. तर विधानसभा निवडणुकीतील भाजप आणि महायुतीच्या घवघवीत विजयाबद्दल भाजपच्या वसई-विरार जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पवार यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.

नरेंद्र पवार यांची संघटन पर्व २०२४च्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती...

विधानसभा निवडणुकीत माजी आ. नरेंद्र पवार यांच्यावर कल्याण पश्चिम आणि उल्हासनगर या दोन विधानसभांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नरेंद्र पवार यांनी उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर, या दोन्ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या विजयामध्ये मोठी भूमिका बजावली. त्याची दखल घेऊन भाजप पक्षश्रेष्ठींकडून नरेंद्र पवार यांची संघटन पर्व २०२४ या सदस्य नोंदणी मोहिमेच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती केली आहे. ज्याअंतर्गत त्यांच्याकडे ठाणे विभागाच्या नऊ जिल्ह्यांतील भाजप सदस्य नोंदणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नालासोपारा येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली वसई-विरार जिल्ह्याची बैठक संपन्न झाली.

नालासोपारा विधानसभा आमदार राजन नाईक, वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे यांच्यासह भाजप प्रदेश सचिव व जिल्हा प्रभारी राणी द्विवेदी, ठाणे विभाग संघटनमंत्री हेमंत म्हात्रे, वसई-विरार जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील, वसई विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज पाटील, युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके, सरचिटणीस प्रज्ञा पाटील, अभय कक्कड, विश्वास सावंत, जे. पी. सिंह तसेच प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा मोर्चा आघाडी अध्यक्ष सरचिटणीस, मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई मेट्रो-३

मुंबई मेट्रो-३ 'बीकेसी ते आचार्य अत्रे' मार्गाचे लोकार्पण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे' मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा २ अच्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा २ अ ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, आज दि.९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो ३च्या या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मेट्रोने ..

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

पहलगाम हल्ल्या नंतर भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना जबरदस्त उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण केले. दि. ७ मे रोजी रात्री १ वाजून ४ मिनिटांनी ते दीड वाजताच्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले. भारतीय दलांनी पाकिस्तानमध्ये बहावलपूर आणि मुरीदके येथे हल्ले केले आणि जैश आणि लष्करचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. कित्येक वर्षांपासून या दोन्ही दहशतवादी संघटना सातत्याने भारताविरोधात कारवाया करत आहेत. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद प्रमूख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर जो जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल प्रमुख आणि आयसी-८१४ अपहरणाचा मास्टरमाइ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121