हॉलिडे डायलिसिस : सुरक्षित प्रवासाला सुस्वास्थ्याची जोड

    02-Dec-2024
Total Views | 27

Holiday Dialysis
पर्यटन आणि प्रवास हा सगळ्यांनाच हवाहवासा असतो. पण, बरेचदा दीर्घकाळ आजाराने ग्रस्त असलेल्या किंवा डायलिसिसवर असलेल्या रुग्णांना पर्यटनाचा आस्वाद लुटता येत नाही. तेव्हा, विशेषत्वाने ‘हॉलिडे डायलिसिस’शिवाय रुग्णांनी सुरक्षित व आरामदायी प्रवासाचे नियोजन कसे करावे, याविषयी वैद्यकीय मार्गदर्शन करणारा हा लेख...
प्रवास किंवा पर्यटन करणे ही शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ कृती समजली जाते. तसेच, पर्यटनामुळे कोणताही आजार अथवा व्यंग असलेल्यांच्या जीवनमानाच्या दर्जातदेखील सुधारणा होते, असाही अनेक संशोधनांत दावा करण्यात आला आहे. पण, ‘क्रोनिक किडनी डिसीज’चा (सीकेडी) आरोग्यावर होणारा परिणाम पाहता, हा आजार असलेल्यांच्या बाबतीत असे म्हणताना दोनवेळा विचार करावा लागतो. तथापि, ‘क्रॉनिक किडनी डिसीज’ (CKD) रुग्णांमध्ये या रोगाची तीव्रता आणि आजाराची गुंतागुंत वाढल्याने निर्माण होणारे अतिरिक्त धोके सिद्ध करणारे कोणतेही पुरावे नाहीत. पण, लांबच्या प्रवासाचे वा पर्यटनाचे नियोजन करताना, या आजारामुळे घातक धोका निर्माण होणार नाही, याची खात्री करून घेणे हितकारक असते.
 
एक-दोन दिवसांच्या सुटीत फिरायला जाणे असो वा मोठी सुटी घेऊन पर्यटनाला जाणे असो, कौटुंबिक स्नेहसंमेलन असो, नव्याच्या शोधात जाणे असो किंवा व्यवसायाच्या कामानिमित्त बाहेर जाणे असो, मोठ्या अंतराचा किंवा दीर्घकालीन प्रवास डायलिसिसच्या रुग्णांसाठीही तितकाच सुखावहअसला पाहिजे. पण, डायलिसिस ही एका निश्चित ठिकाणी, दक्ष राहात प्रशिक्षित व्यक्तीने करायची उपचार पद्धत आहे. या उपचार पद्धतीत जरा जरी चूक झाली, तर ‘कार्डिक अटॅक’ किंवा श्वासोच्छवास त्रास होऊन परिस्थिती रुग्णाच्या जीवावर बेतू शकते.
 
त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीची मूत्रपिंडाची समस्या किती गंभीर आहे, त्या रुग्णावर कोणत्या प्रकारचा डायलिसिस उपचार सुरू आहे, यावरून या उपचार पद्धतीची वारंवारता ठरत असते. उदा. ‘हेमोडायलिसिस’वर असलेल्या रुग्णांना आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करून घ्यावा लागतो आणि ‘पेरिटोनिअल डायलिसिस’वर असलेल्या रुग्णांना रोज डायलिसिस करून घ्यावा लागतो.
 
पण, अलीकडील काळात आरोग्यसेवेतील नव्या शोधांमुळे प्रवासातही लोकांना डायलिसिस करून घेणे शक्य झाले आहे. डायलिसिसवर असलेले रुग्ण प्रवासाच्या बाबतीत उदासीनअसतात किंवा आरोग्य सुरक्षा व दर्जाच्या चिंतेमुळे घरापासून फार काळ लांब राहणे त्यांना शक्य होत नाही. पण, ‘हॉलिडे डायलिसिस’ उपलब्ध असल्यामुळे कौटुंबिक सोहळ्यादरम्यान किंवा व्यावसायिक दौर्‍यादरम्यान केंद्रात जाऊन उपचार घेणे शक्य आहे. ‘हॉलिडे डायलिसिस’मध्ये रुग्णांची सुरक्षितता व आरामदायीपणा यांवर अधिक भर देण्यात येतो. ‘बेस डायलिसिस’प्रमाणेच ‘हॉलिडे डायलिसिस’मध्ये उच्च दर्जाची सेवा प्रदान करण्यात येते. प्रशिक्षित व कौशल्यनिपुण तंत्रज्ञ ही प्रक्रिया पार पाडतात. आरामदायीपणा व उपलब्धतेचा विचार करता, इतर पर्यायांचा विचार करण्यापूर्वी नियमित डायलिसिस युनिटसह या पद्धतीचा विचार करणे आवश्यक आहे.
‘हॉलिडे डायलिसिसशिवाय रुग्णांनी सुरक्षित व आरामदायी प्रवासाचे नियोजन करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच डायलिसिसवर असलेल्या रुग्णांसाठी काही टिप्स येथे देत आहोत :
 
1. तुमच्या नेफ्रोलॉजिस्टचा सल्ला घ्या
 
सर्वप्रथम तुमच्या नेफ्रोलॉजिस्टचा सल्ला घ्या आणि तुम्ही प्रवास करण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडून घ्या. मूत्रपिंडाचा आजार आणि डायलिसिसवर असलेल्या रुग्णांना प्रवासासाठी अधिक नियोजनाची आवश्यकता असल्याने तुमचे नेफ्रोलॉजिस्ट आणि डायलिसिस युनिट तुम्हाला मार्गदर्शक तत्त्वे आखून देतील आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी शिफारस करतील. त्यामुळे नेफ्रोलॉजिस्टकडून ‘इम्युनायझेशन चेक’चे पत्र तुम्हाला मिळाले असेल, तरी प्रवास करण्यापूर्वी तुम्ही त्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
 
2. तुम्ही जाणार असलेल्या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय मदतीचे मूल्यमापन करा
 
आपत्कालीन परिस्थिती कधीही ओढवू शकते, विशेषतः वैद्यकीय मदतीची गरज कधीही लागू शकते. अशा प्रकारची परिस्थिती रुग्णांसाठी प्रसंगी घातकही ठरू शकते. म्हणून वैद्यकीय मदत आवाक्यात असेल असे ठिकाण शक्यतो पर्यटनासाठी निवडावे. त्याचप्रमाणे डायलिसिसवर असलेल्या रुग्णांनी त्यांच्या नियमित डायलिसिस युनिट्स आणि त्यांच्या प्रवासाच्या ठिकाणच्या स्थानिक युनिटच्या नियमित संपर्कात असणे गरजेचे आहे.
 
3. सुयोग्य निवासी व्यवस्था निवडा
 
डायलिसिसवर असलेले रुग्ण कडक पथ्य पाळतात. त्यामुळे त्यांच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करणारा पर्याय निवडणे अनिवार्य आहे. या व्यतिरिक्त ज्यांना मूतखड्याचा त्रास आहे, त्यांना तीव्र तापमानाचा त्रास होऊ शकतो. तेव्हा, अशा रुग्णांनी पर्यटनस्थळाची निवड करताना अशा तीव्र तापमानाच्या ठिकाणाची निवड शक्यतो टाळायला हवी.
 
4. आरोग्य विमा
 
आंतरराष्ट्रीय संरक्षणासह सक्रिय आरोग्य विमा घ्यावा, अशी शिफारसदेखील करण्यात येते. याव्यतिरिक्त ‘क्रोनिक किडनी डिसीज’ (सीकेडी) आणि डायलिसिसवर असलेल्या रुग्णांना आपत्कालीन वैद्यकीय खर्चांच्या संरक्षणासाठी फ्लेक्झिबल आरोग्य विम्यासाठी अर्ज करण्याचा विशेष हक्क आहे. वैद्यकीय उपचार व साहाय्याच्या अनपेक्षित गरजेसाठी रुग्ण अशा योजनांचा दीर्घकालीन प्रवासादरम्यान वापर करू शकतात.
सुरेश संकर 
अग्रलेख
जरुर वाचा
लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई ..