युनुस सरकारच्या काळात आवामी लिगच्या ४०० कार्यकर्त्यांची हत्या

बांगलादेशातील इस्लामिक संघटनांविरोधात पक्षाचा मोठा दावा

    18-Dec-2024
Total Views |

awami league

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Awami League on Yunus Government) 
शेख हसीना यांचा राजकीय पक्ष अवामी लीग हा बांगलादेशातील सर्वात जुना पक्ष आहे. बांगलादेशात झालेले आंदोलन हिंसक वळणावर गेल्यानंतर शेख हसीना यांना संतप्त विद्यार्थ्यांनी सत्तेवरून हटवले. यादरम्यान जुलैपासून त्यांचे सुमारे ४०० नेते आणि कार्यकर्त्यांनी बांगलादेशातील इस्लामिक संघटना आणि जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी हत्या केल्याचा दावा अवामी लीग पक्षाने केला आहे.

अवामी लीगने अलीकडेच जुलैपासून मारल्या गेलेल्या कार्यकर्त्यांची यादी जाहीर केली. या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार, पक्षाने सांगितले की ही एक प्राथमिक यादी आहे आणि येत्या काही दिवसांत आणखी माहिती जाहीर केली जाईल. दि. ५ ऑगस्टपासून शेख हसीना यांचे अवामी लीग सरकार पडल्यानंतर, पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांना संपूर्ण बांगलादेशात पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे.

अनेक प्रकरणांमध्ये, बांगलादेशातील सत्तापालटाच्या वेळी कार्यकर्त्यांची मालमत्ताही पाडण्यात आली. मात्र दोषींना लगाम घालण्यासाठी कोणतीही कारवाई सुरू करण्यात आलेली नाही. उलट अवामी विद्यार्थी संघटना छात्रलीगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले असून त्यांच्या अनेक सदस्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.