आधी राजीनामा द्या, मग बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी करा!

आमदार अतुल भातखळकर : विरोधकांना सडेतोड उत्तर

    17-Dec-2024
Total Views | 58
 Atul Bhatkhalkar

नागपूर : विरोधी पक्षातील सर्व आमदार ईव्हीएमवर निवडून आले. त्यामुळे आधी त्यांनी राजीनामा द्यावा आणि नंतर बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी करण्याचे धाडस करावे, असे उत्तर आमदार अतुल भातखळकर ( Atul Bhatkhalkar ) यांनी दिले आहे. मंगळवार, १७ डिसेंबर रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, उबाठा गटाचे नेते सुनील प्रभू यांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला. यावर भातखळकरांनी उत्तर दिले.

अतुल भातखळकर म्हणाले की, "महाराष्ट्राच्या जनतेने महायुती सरकारला प्रचंड बहुमत दिले. त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये वैफल्यग्रस्त भावना निर्माण झाली आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ईव्हीएम संदर्भात उल्लेख केला. महाराष्ट्रातील जनता बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. पण तुम्ही सगळे ईव्हीएमवरच एका मिनी बसमध्ये बसाल एवढ्या संख्येने निवडून आला आहात. आपण ईव्हीएमवर निवडून आले असल्याने आधी राजीनामा द्यावा आणि नंतर बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी करण्याचे धाडस करावे. चार-पाच महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणूकीत याच ईव्हीएमच्या माध्यमातून त्यांच्या जागा निवडून आल्या. त्यावेळी यांना ईव्हीएम गोड वाटले. पण अवघ्या पाच महिन्यामध्ये यांचा फेक नरेटिव्ह लक्षात आल्याने महाराष्ट्राच्या जनतेने महायुती सरकारला निवडून दिले. त्यामुळे आता ते ईव्हीएमच्या नावाने बोट मोडत आहेत," असे ते म्हणाले.

सुसंस्कृतता, नीतीमत्ता हे शब्द विरोधी पक्षाच्या डायरीमध्ये नाहीत!

अतुल भातखळकर पुढे म्हणाले की, "दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राजकीय पक्षांना ईव्हीएम हॅक होण्याबाबतचे डेमॉन्सस्ट्रेशन करण्यासाठी बोलवले होते. पण यातील एकही राजकीय पक्ष न्यायालयासमोर गेला नाही. त्यामुळे उरल्यासुरल्या विरोधी पक्षाची अवस्था आता नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे. या निवडणूकीत विरोधकांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. जातीपातीचा उल्लेख करत एखाद्या नेत्यावर व्यक्तीगत टीका केली आणि महाराष्ट्रात जातीवादाचे राजकारण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सुसंस्कृतता, नीतीमत्ता हे शब्द विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या डायरीमध्ये नाहीत. पण या सगळ्यावर मात करत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार निवडून आले," असेही ते म्हणाले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121