नवी मुंबई मेट्रो सेवेवर उमटली गुणवत्तेची मोहोर

नवी मुंबई मेट्रोला 3 आयएसओ मानांकने; ३ मानांकन प्राप्त करणारी राज्यातील एकमेव मेट्रो सेवा

    17-Dec-2024
Total Views | 19

navi mumbai metro


नवी मुंबई, दि.१७: प्रतिनिधी 
गुणवत्ता, पर्यावरण, व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षितता यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन करण्याच्या निकषावर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर या मेट्रो परिचालन सेवेला आयएसओ ९००१, आयएसओ १४००१ आणि आयएसओ ४५००१ मानांकने प्राप्त झाली आहेत. अशा प्रकारची तिनही आयएसओ मानांकने प्राप्त करणारी नवी मुंबई मेट्रो ही राज्यातील एकमेव मेट्रो सेवा ठरली आहे.

“आयएसओ मानांकनांद्वारे उच्चतम दर्जाची मेट्रो सेवा पुरविण्यासह गुणवत्ता, शाश्वतता आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सिडकोच्या कटिबद्धतेवर विश्वास दर्शविण्यात आला आहे. नगर विकास आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील सिडकोचे अग्रणी स्थान याद्वारे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे", अशी प्रतिक्रिया सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे.

नवी मुंबई मेट्रो लाईनला परिचालनाच्या पहिल्याच वर्षी तिन्ही आयएसओ प्रमाणपत्र मिळाली आहे. ही तीन आयएसओ मानांकने सिडको मेट्रोला, महा मेट्रो रेले कॉर्पोरेशनच्या माध्यमातून प्राप्त झाली आहेत. तिन्ही आयएसओ प्रमाणपत्र मिळालेली ही महाराष्ट्रातील एकमेव मेट्रो लाइन आहे. महा मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत ब्रिटीश स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूशनद्वारे प्रदान केलेले प्रमाणपत्र शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको यांना सुपुर्द करण्यात आले. सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर या मार्गावर १७ नोव्हेंबर २०२३ पासून मेट्रो सेवेचे परिचालन सुरू झाले असून या मेट्रो सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आयएसओ मानांकनाद्वारे सिडको मेट्रोच्या उत्कृष्ट परिचालनासह नवी मुंबईतील नागरिकांना प्रवासाचा सुरक्षित, विश्वासार्ह आणि शाश्वत पर्याय उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांवर शिक्कामोर्तब झाले आहे. आयएसओ मानांकनांद्वारे जागतिक मानकांची पूर्तता करण्याच्या आणि मेट्रो सेवेची गुणवत्ता सुधारण्याच्या सिडकोच्या प्रयत्नांवर मोहोर उमटविण्यात आली आहे. सिडकोच्या मेट्रो सेवेला मिळालेले आयएसओ मानांकन हे देशातील मेट्रो प्रणालींकरिता आदर्श ठरणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील

देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील 'वक्फ'चा मालकी हक्क संपणार!

Waqf Board Property : देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येणार असल्याची माहिती एएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावर दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालात राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फच्या दाव्यांविषयी एएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती संग्रहित केली आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121