डोंबिवली, ठाणे आणि भाईंदर शहरांना जोडणाऱ्या जलवाहतुकीच्या कामांना गती द्या - खासदार नरेश म्हस्के

    16-Dec-2024
Total Views | 38
 Naresh Mhaske

नवी दिल्ली : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी डोंबिवली, ठाणे आणि भाईंदरला जोडणाऱ्या मुंबईतील जलवाहतुकीच्या ( Water Transport ) संदर्भात संसदेत नियम ३७७ अन्वये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले.

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने (एमएमबी) अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीच्या अंमलबजावणीद्वारे मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) दुर्गम नागरी भागांना जोडण्याची योजना आखली आहे. भाईंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली येथे चार जेट्टी बांधून सुरुवातीला मिरा-भाईंदर, ठाणे, भिवंडी आणि डोंबिवली शहरे जलवाहतुकीद्वारे जोडली जाणार आहेत. पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी वसई खाडी - उल्हास नदीवर प्रवासी जलवाहतूक चालविली जाईल, जी लोकसंख्या आणि रहिवासी क्षेत्राच्या विस्तारासह एमएमआरमध्ये विकसित केलेल्या प्रवासाच्या पद्धतींना पूरक ठरेल, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात दिली.

सागरमाला योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारने ९६ कोटी १२ लाख रुपये खर्च करून या चार जेट्टींचे बांधकाम दीड वर्षांत पूर्ण करणे अपेक्षित आहे. अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक व्यवस्था लोकांमध्ये लोकप्रिय करण्याची गरज आहे, परंतु नोकरशाही आणि आर्थिक आव्हानांमुळे अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी संथ गतीने सुरू असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

प्रवासी जलवाहतूक सुविधा तयार झाल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य सरकारला प्रवासी फेरी किंवा वॉटर टॅक्सी चालकांची ओळख पटवावी लागणार आहे. जसे की फेरी घाट ते मांडवा दरम्यान रो-पॅक्स सेवा, तसेच त्याच मार्गावरील पारंपारिक फेरी सेवा लोकप्रिय आहेत आणि लोकांना आकर्षित करत असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.

एमएमआरमधील वाढती लोकसंख्या आणि रहिवासी क्षेत्र लक्षात घेता अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीची अंमलबजावणी लवकर होणे गरजेची आहे. राष्ट्रीय जलमार्ग ५३ लगत आणखी जेट्टी बांधण्याची योजना असली तरी ती नंतर बांधली जाणार असून वसई, कल्याण, पारसिक, नागलाबंदर, अंजुर दिवे आणि घोडबंदर/गायमुख या भागात ते काम होणार आहे. घोडबंदर येथील गायमुख येथे जेट्टी कार्यरत असून त्याचा वापर फ्लोट चालविण्यासाठी केला जात असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

मुंबईतील अंतर्देशीय प्रवासी जल वाहतूक प्रणालीची अंमलबजावणी एमएमआरमधील कनेक्टिव्हिटी आणि प्रवास सुलभता सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. उपलब्धता, परवडणारी क्षमता आणि सुविधा यासारख्या विविध घटकांवर हि सेवा अवलंबून आहे. हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात आणि प्रकल्प पूर्ण करण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर करावेत, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय बंदर, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्र्यांकडे केली.

अग्रलेख
जरुर वाचा
अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121