"एक दिवस मुस्लीम बहुसंख्य असतील", ममतादीदींच्या सरकारच्या मंत्र्याची मुक्ताफळे

भारताची परिस्थिती बांगलादेशसारखी करु पाहण्याचे तृणमूलचे प्रयत्न ; भाजपचे प्रतिपादन

    16-Dec-2024
Total Views |
 Firhad Hakim

मुंबई : पश्चिम बंगालचे नगर विकास मंत्री आणि कोलकत्त्याचे महापौर फिरहाद हकीम यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात फिरहाद हकीम यांनी म्हटले की, "अल्लाहची इच्छा असेल तर, एक दिवस मुस्लीम बहुसंख्य असतील." यावरुन ममता बॅनर्जी ( Mamta Banerjee ) सरकारने आपल्या मंत्र्यांना दिलेली सूट दिसून येते. तृणमूल कॉंग्रेस भारताची परिस्थिती बांगलादेशसारखी करु पाहत असल्याचे भाजपने सांगितले. यावर भाजपने आपला विरोध व्यक्त केला आहे.

ममता बॅनर्जी सरकारचे मंत्री व महापौर फिरहाद हकीम यांनी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात "आम्ही ( मुस्लीम ) बंगालमध्ये ३३ टक्के आणि संपूर्ण देशात १७ टक्के आहोत. आपल्याला अल्पसंख्यांक म्हटलं जातं. परंतु अल्लाहची इच्छा असेल तर, एक दिवस मुस्लीम बहुसंख्य असतील" असे विधान केले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपाने त्यांच्या या विधानावर प्रखर विरोध नोंदवला आहे. हे विधान म्हणजे बांगलादेशसारखी स्थिती निर्माण करण्याचा इशारा असल्याचे बंगालचे भाजपाध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी सांगितले आहे. फिरहाद हकीम हे ममता बॅनर्जी सरकारचे विश्वासू नेते मानले जातात. त्यांची वक्तव्ये नेहमी वादाची कारणे बनतात. यावरुन सरकारने त्यांना दिलेली सूट दिसून येते.