जैवविविधतेचे सातारी कोंदण; नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे धक्का पोहोचेल का ?

    16-Dec-2024
Total Views | 157
new mahabaleshwar project


सातार्‍यातील दर्‍याखोर्‍यांच्या कुशीत येणार्‍या ‘नवे महाबळेश्वर प्रकल्पा’चा (new mahabaleshwar project). ‘युनेस्को’चा जागतिक नैसर्गिक वारसास्थळाचा दर्जा लाभलेल्या कास पठारापासून पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’सारखा जैवसंपन्न प्रदेश या प्रस्तावित प्रकल्पाला खेटून आहे (new mahabaleshwar project). अशा जैवसमृद्ध परिसरातील जैववैविध्याचा आढावा घेणारा हा लेख... (new mahabaleshwar project)
 
 
 
सातारा जिल्हा निसर्गाचे वरदान लाभलेला. जिल्ह्याचा अर्धा भाग दुष्काळी असला तरी तिथली जैवविविधताही श्रीमंत आहे. हिरव्यागार पश्चिम सातार्‍याची जैवश्रीमंती तर विचारूच नका. भव्य-दिव्य सह्य कड्यातून घरंगळणारे धबधबे, पारणे फेडतील अशा घळी, दर्‍या आणि त्यांतून वावरणारे असंख्य प्राणी, पक्षी, कीटक. ही सगळी कोयना माईची लेकरे आहेत. तिच्या अंगाखांद्यावर निर्भयपणे खेळणारी. या भागात वनस्पतींचे उदंड साम्राज्य आहे. शैवाळे, शैवाके, अळंबीपासून वेली, महावेली, झुडुपे, वृक्ष, महावृक्ष, काटेरी जाळ्या असा सगळा पसारा या परिसरात पहायला मिळतो. आजवर जे लोक कोयना साताराच्या सदाहरित जंगलात फिरले आहेत किंवा राहिले आहेत, त्यांना या जैवविविधतेबाबत तसु मात्र खोटे वाटणार नाही. महाराष्ट्राचा मानाचा हिरवा शिरपेच म्हणजे कोयना पट्टा. परंतु, काही वेळा आपण विकासाच्या जागा या निसर्गाच्या खास ठेवणीमधील निवडतो. आपल्याला फक्त चार दिवसांसाठी ’सेकंड होम’ हवी असतात. मग जागाही आपण अशा निवडतो की, जिथे निसर्गाच्या मर्यादित अधिवासात अनेक वनस्पती वाढत असतात आणि अनेक जीवजंतू वावरत असतात. गळ्याखालचा मोरपंखी पंखा फुलवणारा चाळकेवाडीचा ‘सरडा सूपर्बा’ (Sarada superba) असूदे किंवा अपोनोगेटॉन कुळातील कासच्या भागात आढळणारी ‘सातारा वाय तुरा’ (Aponogeton satarensis) असूदे. या दोन्ही प्रजाती ‘आययूसीएन’च्या लाल यादीत ‘संकटग्रस्त’ म्हणून नोंदविण्यात आल्या आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे यासारख्या संकटग्रस्त असणार्‍या अनेक प्रजाती या ‘नवीन महाबळेश्वर प्रकल्पा’च्या विळख्यात येत आहेत.
 
 
सातार्‍यातील हा भाग इतका समृद्धीने भारलेला म्हणता येईल की, येथील ३५ प्रजाती या ‘आययूसीएन’च्या लाल यादीत समाविष्ट आहेत, तर जवळपास ३८ प्रजाती या ‘भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२’ अन्वये संरक्षित केलेल्या आहेत. कोयनेमध्ये आढळणारा ‘कोयना टोड’ (Xanthophryne koyanensis) हा मंडूक यापूर्वीचे कोयनेच्या खोर्‍यातील वाढत्या बांधकामामुळे धोक्यात आलेला आहे. तोही याच ‘नव महाबळेश्वर प्रकल्पा’तील पट्ट्यात आहे. ‘सातारा गेको’ किंवा ‘सातारी पाल’ या प्रजातीचे प्रमुख अधिवास हे चाळकेवाडी आणि ठोसेघरमधील सडे आहेत. आज या अल्पसंख्य झालेल्या ‘सातार पाली’ला वाचवण्याचे प्रयत्न इथे सर्वांच्या मदतीने होत आहेत. ही दोन्ही ठिकाणे कोयनेच्या पाणलोट क्षेत्राला लागूनच आहेत. या प्रकल्पाच्या अंतर्गत येणारे सडे हा वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे. Cryptocoryne tortusa ही वनस्पतीदेखील महाबळेश्वर परिसरात अत्यल्प स्थितीत सापडते, जी औषधीदृष्ट्या महत्त्वाची आहे. Eriocaulon bolei या ‘धनगरी फेटा’ची दुर्मीळ प्रजात याच ‘महाबळेश्वर प्रकल्पा’च्या आसपासच्या सड्यावर मिळते. हे सोडून असंख्य दर्जेदार वनस्पती, शैवाके, शैवाळे, पाणथळ वनस्पती यांनी ही जागा सजलेली आहे. या वनस्पती जगताचा आधार घेऊन जगणारे जीव त्यांची सुखेनैव चाललेली एक अन्नसाखळी आहे. अनेक उमेदीचे प्राणीशास्त्रज्ञ आणि वनस्पतीशास्त्रज्ञ येथील सड्यांवरील प्राणी व वनस्पती प्रजातीचा अभ्यास करत आहेत. अनेकांनी इथल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या दुर्मीळ प्रजाती शोधल्या आहेत. यूजीसी, भारत सरकार, विविध अशासकीय संस्था, होतकरू निसर्गप्रेमी याच परिसरातील जैवविविधता वाचवण्यासाठी-जपण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसतात. इतके सगळे असूनही ‘नव महाबळेश्वर प्रकल्प’ हा जैवविविधता जपून करण्यात येणार आहे, असे सांगितले जात आहे.
 
 
विकास सुरू होतो तो जमिनीच्या सपाटीकरणाने. मग रस्ते बांधले जातात. वीजेचे खांब जंगलात रुतवले जातात. यंत्रांची घरघर चालू होते. शांत, समृद्ध कोयनेच्या क्षेत्रात नव महाबळेश्वर विकसित होताना ते आवाजविरहित थोडीच होणार आहे. मग काँक्रिटचे लगदे येतील. ठोकळ्यांनी इमारती बनतील. निसर्गाच्या चलविचल अधिवासातील स्थिर, निर्जीव निवासात रहायला शहरातले पर्यटक येतील. मग प्लास्टिक येईल. ते आले की, कोयनेतील वाघ मिनरल वॉटरची बाटली तोंडात घेऊन चालताना एखादा व्हिडिओ व्हायरल होईल. साधी चहाची टपरी टाकली तरी, टपरीच्या आकारापेक्षा चार-पाच पट जागा वापरात येते. शासनाने प्रस्तुत केलेल्या नियमावलीत २० अंशांपेक्षा जास्त उतारावर बांधकाम टाळले जाईल. पर्यावरण विभागाच्या नियमानुसार काम होईल. जैवविविधता प्राधिकरणानुसार काम होईल. असे असले तरी, तिथे तसे काम होईल का, याबाबत निसर्गप्रेमी साशंक आहेत. ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्प’ आणि बफर क्षेत्राच्या लगतचा भाग या प्रकल्पात येत आहे. त्यामुळे तिथेही नियम पाळून विकास होणार आहे. मात्र, नियम कोणते हे अस्पष्टच आहे. या विकासाने काय सिद्ध होणार आहे, हे सगळे अधांतरी प्रश्न आहेत. निसर्गप्रेमी, अभ्यासक यांना या प्रकल्पाबाबत बरीच नाराजी आहे, हे शासनालाही माहीत आहे.
 
 
लोकहो, तुम्ही स्वतः एकदा सांगली पाटण तालुक्याच्या सीमेवरची गावे, सडे पायाखालून घाला. चाळकेवाडीपासून ते जावळीपर्यंतचा भाग शक्यतो पावसाळ्यात पायी फिरा. निसर्गाने काय ताटात वाढून दिले आहे, हे आपले आयुष्य बाजूला सारून बघा. कधीतरी एकदा या सातारी पठारांच्या गवतावरून हात फिरवा. कधी कुसळांच्या डोंगरावर जाऊन पहा. सळसळणारा अस्सल नाग जेव्हा बेडरपणे इथे फणा काढतो, तेव्हा तो सांगत असतो की, ही माझी जमीन आहे. इथल्या प्रत्येक जीवाचा कोयनेच्या पाण्यावर अधिकार आहे. ‘नव महाबळेश्वर प्रकल्पा’हूनही सुंदर असलेला परिसर आता तिथे नांदत आहे. कारण तो निसर्गाच्या श्रेष्ठ हातांनी बनलेला आहे.
 
 
या प्रकल्पातून स्थानिक रोजगारनिर्मिती झाली तरी तिथले भूमिपूत्र हे रोजगार करतच आहेत. कामासाठी बाहेरगावी स्थिरस्थावर होतच आहेत. याबाबत बरेचदा चर्चा झाल्या आहेत. मात्र, निसर्गाचे मातेरं करून आपल्याला विकासाची शिखरे गाठता येणार नाहीत, हे वेळी-अवेळी पडणार्‍या पावसाने सिद्ध केले आहे. याच तापमानवाढीचा फटका सरकारच्या तिजोरीवरदेखील बसत आहे, हेही वास्तव आहे. विकास दुसरीकडेही होईल. सरकारला त्यासाठी पाठिंबाच असेल. मात्र, ‘नव महाबळेश्वर प्रकल्पा’मधील जावळीपासून चांदोलीच्या सातार सीमेपर्यंतचा भाग श्वापदांच्या हुंकारांनी आणि पाने-गवताच्या सळसळीने भारलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे हे अ‍ॅमेझॉन तूर्तास अ‍ॅमेझॉनच राहू देते.


या पट्टयातील वन्यजीवांचे IUCN लाल यादीनुसार वर्गीकरण -
इंपेरीअल इगल - Eastern Imperial Eagle - VU
निलगिरी पारवा - Nilgiri Pigeon - VU
धनेश - Great Pied Hornbill - VU
पांढर्‍या ठिपक्यांचा फॅनटेल - White Spotted Fantail - EN
चाैकोनी शेपटीवाला बुलबुल - Square Tailed Bulbul - EN
सह्याद्री उंदीर - Sahyadri Firest Rat - VU
स्लॉथ अस्वल - Sloth Bear - VU
चतुशृंगी काळवीट - Four Horned Antelope - VU
रानमांजर - Wild Cat - Critical
भारतीय लांडगा - Indian Wolf - EN
कोयना वाघ - Koyana Tiger - EN
लेथचं मऊपाठी कासव - Soft back Turtle - Critical
सुरकुत्या बेडूक - Humayun's Wrinkled Frog - VU
आखूड पायांचा बेडूक - Short Legged Frog - VU
कोयना टोड - Koyana Yellow Toad - EN
या पटट्यातील IUCN प्रमाणे संरक्षित व दुर्मिळ वनस्पती -
बोलेई धनगर फेटा - Eriocaulon bolei - Critically EN
सातारी वाय तुरा - Appnogeton satarensis - EN
जैनी कंदीलफूल - Ceropegia jainii - Critically EN
 
 
 

- रोहन पाटील
(लेखक वनस्पती अभ्यासक आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121