रामकाळपथ : नाशिकचे वैभव

    16-Dec-2024
Total Views | 38

Ramkal Path
 
केंद्र शासनाकडून १०० कोटी रुपये, तर उरलेला ४८ कोटी रुपयांचा निधी राज्य शासन आणि नाशिक मनपाच्या माध्यमातून उभारला जाईल. हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर खर्‍या अर्थाने नाशिकची पौराणिक ओळख अधिक दृढ होणार आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिर, रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीता गुंफा येथे देश विदेशातून शेकडो पर्यटक दररोज या भागाला भेट देत असतात. त्यांना प्रभू श्रीराम यांचा सहवास ‘रामकाळ पथ’ हा प्रकल्प सत्यात उतरल्यानंतर खर्‍या अर्थाने मिळणार आहे.
 
नाशिक शहरात २०२७ साली ‘सिंहस्थ कुंभमेळा’ होऊ घातला आहे. त्यादृष्टीने शासनाबरोबरच प्रशासनही कामाला लागले आहे. पुढील एक-दोन वर्षांच्या कालखंडात कुंभमेळ्याच्या दृष्टीने सर्व विकासकामे पूर्ण होतील. कुंभपर्वातील शाहीस्नान लाखो भाविकांच्या साक्षीने पार पाडले जाईल. या शाहीस्नानासाठी आणि पर्यटनासाठी नाशिक नगरीत दाखल होणार्‍या भाविकांनी शहराचा पौराणिक ठेवा आपल्या डोळ्यात साठवत आपल्यासोबत घेऊन जावा, यासाठी केंद्र सरकारच्या साथीने राज्य आणि नाशिक मनपाने कंबर कसली आहे. त्यादृष्टीने केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाकडून ‘रामकाळ पथ’ प्रकल्पाच्या निर्माणासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांच्या पाऊलखुणा असलेल्या सीतागुंफा-काळाराम मंदिर ते रामकुंड असा १४८ कोटी रुपये निधी खर्च करुन ‘रामकाळ पथ’ निर्माण केला जाणार आहे. यामध्ये सीतागुंफा ते श्री काळाराम मंदिर सुशोभीकरण, काळाराम मंदिर ते रामकुंड परिसराचे सौंदर्यीकरण, अहिल्यादेवी होळकर पूल व गांधी तलाव भागाचे सौंदर्यीकरण, रामकुंड परिसरात प्रभू श्रीराम यांचे बाण मारतानाचे शिल्प, टाळकुटेश्वर पुलापर्यंत विविध पुतळे, कुंभस्नान होते, त्या रामकुंडाच्या व लक्ष्मणकुंडाच्या मध्यभागी सतत जलप्रवाही भव्य गोमुख, काळाराम मंदिरासमोरील जागेत प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित देखावे, स्तंभ आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून १०० कोटी रुपये, तर उरलेला ४८ कोटी रुपयांचा निधी राज्य शासन आणि नाशिक मनपाच्या माध्यमातून उभारला जाईल. हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर खर्‍या अर्थाने नाशिकची पौराणिक ओळख अधिक दृढ होणार आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिर, रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीता गुंफा येथे देश विदेशातून शेकडो पर्यटक दररोज या भागाला भेट देत असतात. त्यांना प्रभू श्रीराम यांचा सहवास ‘रामकाळ पथ’ हा प्रकल्प सत्यात उतरल्यानंतर खर्‍या अर्थाने मिळणार आहे.
 
नाशिक शहरालाही पुन्हा एकदा रामायणकालीन चेहरा मिळणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यटन मंत्रालय, राज्य सरकार आणि नाशिक मनपा यांच्या परस्पर समन्वयाने प्रकल्प उभारणीला सुरुवात होणार आहे.
 
‘एचएएल’ची ‘सुखोई’ भरारी
 
भारताची हवाई सीमा सुरक्षित व भक्कम ठेवण्यासाठी नाशिकच्या ‘एचएएल’मध्ये निर्माण होणार्‍या ‘मिग’ विमानांचा कायमच मोठा हातभार राहिला. अनेक वर्षे या विमानांनी आपला समर्पणभाव जपत देशाच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. पण, काळाबरोबर बदलणे प्रत्येकाचा स्थायीभाव असल्याने, आता भारताकडूनही लढाऊ विमानांच्या बाबतीत कुस बदलत आधुनिक विमाने तयार केली जात आहेत. ‘मिराज’, ‘तेजस’, ‘सुखोई’ आणि ‘राफेल’ या आधुनिक विमानांनी भारत सज्ज झाला असून, कोणत्याही महाशक्तीला टक्कर देता येईल, इतका सामर्थ्यवान झाला आहे. आता केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालय आणि नाशिकच्या ‘एचएएल’मध्ये सुखोई विमाने तयार करण्याचा करार झाला आहे.
 
त्यानुसार आता ‘एचएएल’ १२ ‘सुखोई’ विमाने तयार करणार आहे. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला मोठी चालना दिली जात असून, १३ हजार, ५०० कोटी रुपयांच्या या कराराअंतर्गत नाशिकच्या ‘एचएएल’मध्ये ‘सुखोई’ लढाऊ विमाने तयार होणार आहेत. येथे ‘सुखोई’ तयार करत असताना त्यामध्ये ६२.६टक्के स्वदेशी सामग्री असेल. यातून भारतीय संरक्षण उद्योगामुळे निर्माण होणार्‍या स्वदेशी उद्योगांना चालना मिळणार आहे. तसेच, हवाई दल अधिक सक्षम होणार असून, देशाची संरक्षण सज्जता वृद्धिंगत होणार आहे.
 
दरम्यान, ‘सुखोई’ दोन आसनी, ट्विनजेट, मल्टीरोल एअर सुपिरिऑरिटी फायटर विमान असून, सर्व हवामानात उपयुक्त ठरणारे लांब पल्ल्याचे लढाऊ विमान आहे. ‘आत्मनिर्भर भारता’च्या मोहिमेचा एक भाग म्हणून संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाला चालना देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यामुळे देशातील संरक्षण उपकरणे उत्पादन करणार्‍या कंपन्यांनाही व्यवसाय करण्यास वाव मिळेल. सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ मुख्यत्वे भारतीय हवाई दलाची सेवा करते. येथे आतापर्यंत ‘मिग’, ‘मिराज’ आणि ‘तेजस’ विमानांचे भाग तयार करण्यात आले आहे. जवळजवळ सर्वच लढाऊ विमानांची यशस्वी चाचणी येथे पार पडली. आताचा आधुनिक भारत शत्रूराष्ट्राच्या हद्दीत घुसून लष्करी कारवाई करत असताना तंत्रज्ञानातही मोठी झेप घेण्यास सज्ज झालाय.
 
त्याअनुषंगाने भारत आणि अमेरिका लष्करी विमानांसाठी प्रगत ‘जीई इंजिन’च्या निर्मितीसाठी करारावर स्वाक्षरी करण्यास तयार आहे.
 
विराम गांगुर्डे 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121