आमदार नितेश राणेंनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ!
15-Dec-2024
Total Views | 71
1
मुंबई : नागपूरातील राजभवन येथे महायुतीच्या एकूण ३९ आमदारांचा शपथविधी १५ डिसेंबर २०२४ रोजी पार पडला. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. नागपूर राजभवन येथे झालेल्या मंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यामध्ये नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
नितेश राणे यांना राजकारणाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले. त्यांचा हा मंत्रीपदापर्यंतचा प्रवास हा पुढीलप्रमाणे.
नितेश राणे यांचे स्वामी विवेकानंद हायस्कुल चेंबूर इथे इ. १०वी पर्यंत शिक्षण झाले. पुढील एमबीए पर्यंतचे शिक्षण लंडन येथे झाले. ते २००५ मध्ये लंडन येथून भारतात परतले. त्याच दरम्यान २००५ मध्ये नारायण राणे हे बंड करुन शिवसेनेतून बाहेर पडले होते. त्यात २००६ साली स्वाभिमान संघटनेची स्थापना करण्यात आली. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून राज्यभर सामाजिक कार्य उभे केले. २००९ मध्ये मुंबई पालिकेवर भव्य मोर्चा काढून त्यांनी आपल्या ताकदीची सर्वांना दखल घ्यायला लावली. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून २०११ साली घेतलेल्या रोजगार मेळाव्यात एकाच दिवशी २५ हजार ३०० लोकांना नोकरी देऊन नितेश राणे यांची 'ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली. वेळोवेळी विविध विषय, मुद्दे घेऊन आंदोलने उभारली. त्यांनी स्वाभिमान संघटना राज्यभर वाढवली.
नितेश राणेंचा मंत्रिपदापर्यंतचा प्रवास
२००६ - स्वाभिमान संघटनेची स्थापना
२०१४ - काँग्रेस पक्षातून कणकवली विधानसभेतून पाहिल्यांदा आमदार
२०१५-१६ मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे करून विशेष भूमिका बजावली.