नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, आकाश फुंडकर, जयकुमार गोरे यांचा समावेश
15-Dec-2024
Total Views | 36
मुंबई : 'व्हिजनरी' नेता अशी ओळख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात ( Cabinet ) १९ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. सर्वाधिक नऊ चेहरे हे भाजपमधील आहे.
भाजपने यंदा नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, आकाश फुंडकर, अशोक उईके, संजय सावकारे, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, पंकज भोयर यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली आहे. शिवसेनेच्या वतीने प्रताप सरनाईक, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, संजय शिरसाट, योगेश कदम, आशिष जयस्वाल यांचा पहिल्यांदाच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नरहरी झिरवळ, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक हे आमदार पहिल्यांदाच मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत.