एकत्रित निवडणुकांचे विधेयक सोमवारी लोकसभेत सादर होणार

    14-Dec-2024
Total Views | 36
Loksabha

नवी दिल्ली : केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल सोमवारी, १६ डिसेंबर रोजी लोकसभेत ( Loksabha ) 'संविधान (एकशे एकविसावी सुधारणा) विधेयक, २०२४' सादर करतील. ही घटनादुरुस्ती एकत्रित निवडणुकांशी (वन नेशन वन इलेक्शन) संबंधित आहे.

"संविधान (एकशे एकविसाव्या सुधारणा) विधेयक, २०२४ केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे भारतीय संविधानात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक सादर करण्यासाठी परवानगी मागणार आहेत. तसेच विधेयक सादर करणार आहेत," असे कामकाजाच्या यादीत म्हटले आहे. लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी पहिले दुरुस्ती विधेयक असेल. त्याचवेळी दिल्ली, जम्मू आणि काश्मीर आणि पुद्दुचेरीमधील विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्यासाठीचे दुसरे विधेयकही केंद्रीय मंत्री मेघवाल सादर करणार आहेत.

या विधेयकाची प्रत खासदारांना देण्यात आली आहे. 'वन नेशन वन इलेक्शन'ला विरोधक सातत्याने विरोध करत आहेत. मात्र, या विषयावर व्यापक सल्लामसलत आणि चर्चा व्हावी, यासाठी केंद्र सरकारतर्फे हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे म्हणजेच जेपीसीकडे पाठविण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने १२ डिसेंबर रोजी 'वन नेशन वन इलेक्शन' विधेयक मंजूर करून संसदेत सादर करण्याचा मार्ग मोकळा केला. सत्ताधारी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने याचे स्वागत केले असून यामुळे वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी काँग्रेसप्रणित विरोधी इंडी आघाडीने या संकल्पनेस विरोध केला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121