हैदराबाद : 'पुष्पा २ : द रुल' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हैदराबाद मधील संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत २ जणांचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि आता त्यावर तेलंगणा पोलिसांनी कारवाई करुन अल्लु अर्जुनला ताब्यात घेतले आहे.
हैदराबादमधील संध्या चित्रपटगृहात ४ डिसेंबर २०२४ रोजी पुष्पा २ चित्रपटाचा प्रिमियर आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपटातील प्रमुख कलाकार अल्लु अर्जुन आणि रश्मिका मंदाना उपस्थित होते. अल्लु अर्जुनला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. आणि याच गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये उपस्थित असलेल्या रेवती यांचा मृत्यू झाला. तर तिचा मुलगा श्रीतेज बेशुद्ध झाला होता. याच प्रकरणी अल्लु अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.